google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 45 वर्षानंतर पुन्हा शाळेच्या पायरीवर... नाझरे विद्यामंदिर एस. एस.सी. 1980 बॅच मित्र संमेलन संपन्न..जीवनात आनंद आणि समाधान निर्माण होण्यासाठी मित्र संमेलन गरजेचे...- प्रा. पी.सी. झपके

Breaking News

45 वर्षानंतर पुन्हा शाळेच्या पायरीवर... नाझरे विद्यामंदिर एस. एस.सी. 1980 बॅच मित्र संमेलन संपन्न..जीवनात आनंद आणि समाधान निर्माण होण्यासाठी मित्र संमेलन गरजेचे...- प्रा. पी.सी. झपके

45 वर्षानंतर पुन्हा शाळेच्या पायरीवर... नाझरे विद्यामंदिर एस. एस.सी. 1980 बॅच मित्र संमेलन संपन्न..



जीवनात आनंद आणि समाधान निर्माण होण्यासाठी मित्र संमेलन गरजेचे...- प्रा. पी.सी. झपके

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

नाझरे प्रतिनिधी काळ कितीही पुढे गेला तरी शालेय जीवनाची आठवणी मनातून कधी पुसल्या जात नाहीत. 45 वर्षांपूर्वी एकत्र बसणारे, एकत्र खेळणारे, एकत्र खेळणारे वर्गमित्र, 

मैत्रिणी पुन्हा एकदा शाळेच्या पायरीवर भेटले आणि काही क्षणासाठी काळ जणू मागे वळला व यामधून दुनिया का सबसे किमती तोहफा एक अच्छा मित्र है.. जो किंमत से नही किस्मत से मिलता है.. हे समजून आले. 

    नाझरे विद्यामंदिर एस. एस. सी. 1980 बॅच चे पहिले मित्र संमेलन शाळेच्या आवारात मोठ्या उत्साहात पार पडले. 

25 वर्गमित्र आणि सहा वर्ग मैत्रिणीच्या उपस्थितीने शाळेचा परिसर आनंद, हशा आणि आठवणीने भरून गेला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्ध चंद्र 

झपके होते, तर या उपक्रमाचे जनक व स्टार ऑफ द गेट प्रा. राजेंद्र ठोंबरे ठरले. त्यांच्या प्रयत्नामुळे 45 वर्षानंतर पुन्हा सर्व वर्गमित्र एकत्र आले. सर्व गुरु वर्य व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची हलगी.. तुतारीच्या नादात स्वागत मिरवणूक निघाली. 

सर्व मान्यवरांना फेटे बांधून पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून व सरस्वती पूजन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. 

    आयोजक रविराज शेटे यांनी केलेल्या प्रास्ताविकात एकाच घराण्यातील गुरुवर्य काजी गुरुजी, विद्यार्थी अलीम काजी, विद्यार्थिनी रूखीया काझी यांचे नाते जपण्याचा व मित्रतेचे नाते जपण्याचा आम्हास आनंदी आनंद होत आहे असे सांगितले.

 तसेच आद्य गुरु कोळेकर महास्वामीजी व शैक्षणिक गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या कृपाशीर्वादाने हा कार्यक्रम होत असल्याचे सांगितले. गुरुजन व सर्व वर्ग मित्रांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर प्रत्येकाने स्वतःचा परिचय देताना

 जुन्या आठवणीचा ओघ सुरू झाला. गुरुवर्य नाकील, घोंगडे, काजी, मिसाळ यांनी सेवा काळातील ह्रदय पर्शी आठवणी सांगत विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले व आशीर्वाद दिले. 

अध्यक्ष मनोगतात प्रा. पी.सी. झपके म्हणाले जीवनात आनंद आणि समाधान निर्माण होण्यासाठी मित्र संमेलन सारख्या भेटी आवश्यक असतात व अशा कार्यक्रमामुळे ताण तणाव दूर होतो व मन प्रसन्न होते. 

     सदर प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे, गुरुवर्य सिद्धेश्वर झाडबुके, विद्यार्थी हरी अदाटे, राजू बनसोडे, सलीम तांबोळी, प्रकाश माने, संजय रायचुरे, तुकाराम मिसाळ, 

शालन गोडसे, सुरेखा शिरदाळे, मुमताज काझी, अरुणा घोडके, रुखिया काजी, नयन देशपांडे, जाफर मुलानी, तात्या सो बंडगर, तानाजी बनसोडे, परमेश्वर दिघे, तानाजी वाघमोडे, महादेव वाघमोडे, 

अलीम काझी, दाऊद मुलाणि, वसंत अडसूळ, पर्यवेक्षक विनायक पाटील, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश परिचारक यांनी उत्स्फूर्त केले. आयोजनात नागेश नांगरे, रविराज स्वामी, 

मच्छिंद्र भोसले यांनी परिश्रम घेतले. तसेच स्वागत गीत प्रीती स्वामी, विमल पाटील, प्रकाश माने, गुरुवर्य सिद्धेश्वर झाडबुके यांनी रंगत आणली. मित्रामध्ये जुन्या आठवणीवर.हशा, थोडेसे भावनिक क्षण आणि एकत्र छायाचित्र अशा वातावरणात सारा दिवस कसा गेला

 हे कोणालाच कळले नाही व शेवटी सर्वांनी एक मुखाने ठरविले ही भेट शेवटची नाही आता दरवर्षी भेटू कारण मैत्री हा आमचा श्वास आहे व चार दशकानंतर हा सोहळा आनंद, ओलावा

 आणि स्नेह या सुगंधात नाऊन निघाला. तो केवळ मित्राचा मेळावा नव्हता तर तो होता जुन्या काळाशी पुन्हा एकदा हात मिळवण्याचा आनंद उत्सव होता. शेवटी सर्वांचे आभार रविराज स्वामी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments