शक्तिपीठ महामार्ग मोजणीस सहकार्य करा.. उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी
मृत्यूला सामोरे जाऊ परंतु जमिनी देणार नाही.. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
मृत्यूला सामोरे जाऊ परंतु जमिनी देणार नाही.. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी- शक्तिपीठ महामार्ग मोजणी शेतकऱ्यांनी विरोध करू नये त्यांच्या मागण्या आपण शासन दरबारायापर्यंत पोहोचवू
व मोजणीसाठी प्रत्येकाने शेतामध्ये येऊन हद्दी, बोअर, विहीर, ठिबक, पाईपलाईन, दाखविणे गरजेचे आहे म्हणजे नुकसान होणार नाही
व यासाठी बाधित शेतकऱ्यांनी संमती दिल्यास चार पट मोबदला अधिक मिळेल व यासाठी विरोधाची भूमिका सोडा व महामार्ग मोजणी सहकार्य करा असे आवाहन
मंगळवेढा उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी यांनी श्री दत्त मंदिर नागरे वझरे येथे बाधित शेतकऱ्याच्या बैठकीत केले.
सुरुवातीस शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार संतोष कणसे यांनी केले.
तर शक्तिपीठ मोजणी शेतकऱ्यांचा विरोध आहे व यासाठी आपण कोर्टात जाऊ व मुख्यमंत्र्याची शिष्टमंडळ घेऊन भेट घेऊ व त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा सांगू असे
शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष एडवोकेट सचिन देशमुख यांनी यावेळी सांगितले.
तर शक्तिपीठ महामार्गात शेतकऱ्यांना शेअर्स देऊन म्हणजे पार्टनरशिप द्या असे शेतकरी राजू पाटील यांनी यावेळी सांगितले. शक्तीपीठ महामार्ग होऊ नये असे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहेच
व झाल्यास शिवलीलामृत,
पांडव प्रताप, हरिविजय, भक्ती विजय या ग्रंथाचे लेखक श्रीधर स्वामी महाराज व संजीव स्वामी महाराज यांचे प्रसिद्ध असलेले
येथील श्री दत्त मंदिराचा यात समावेश करा व महामार्गास जोडण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन पत्रकार रविराज शेटे यांनी यावेळी केले.
तर मा. प्राचार्य के. वाय. पाटील, शेतकरी सचिन बनसोडे, तमा पाटील, डॉ. हरिश्चंद्र सोनवणे, मंगेवाडी चे मा. उपसरपंच चंद्रकांत चौगुले,
बाळासो शिंदे इत्यादी शेतकऱ्यांनी शक्तिपीठ विरोधात मत व्यक्त केले.
मृत्यूला सामोरे जाऊ परंतु जमिनी देणार नाही
कोणत्याही शेतकऱ्याची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग करणे म्हणजे राजकीय स्वार्थापोटी हा महामार्ग करणे व शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणे हे बरोबर नाही व येथून चार किलोमीटर अंतरावर नागपूर रत्नागिरी महामार्ग मोकळा पडला आहे
व या महामार्गास शक्तिपीठ महामार्ग जोडा म्हणजे येथील जमिनी वाचतील व सरकारची बचत होईल परंतु असे न करता
शासन शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा असेल तर मृत्यूला सामोरी जाऊ परंतु जमिनी देणार नाही
असा परखड इशारा शेतकरी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष दादासो वाघमोडे यांनी यावेळी दिला. सदर प्रसंगी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रकाश सोळशे, शेतकरी सुहास देशपांडे, अमोल खरात, वसंत पाटील, आनंदा कोकरे, मल्हारी चव्हाण, श्रीधर देशपांडे,
तानाजी कवठेकर, भारत बनसोडे, सचिन कोकरे, भारत पाटील, विनू बुवा पाटील, पांडुरंग बनसोडे, गंगाधर जोंधळे, बाबुराव जोंधळे,
आप्पासो पाटील, पोपट जोंधळे, दीपक शिरदाळे, संजय बनसोडे, श्रीधर देशपांडे, लक्ष्मण आलदर, बाबासो सरगर, भारत शेळके, पोपट गुरव,
हनुमंत गोसावी, पत्रकार अतुल फसाले,लक्ष्मण जाधव, विजय गुरव, सुरेश शिंदे, सुभाष गुरव, देना पाटील व इतर बाधित शेतकरी,
तसेच मंडल अधिकारी हरीश जाधव, हरिभाऊ चांडोले, तलाठी, पोलीस पाटील, भूसंपादन अधिकारी,
महामार्ग अधिकारी, नाझरे, वझरे, बलवडी, चिनके, कोळे, यलमार मंगेवाडी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रविराज शेटे तर आभार उत्तम सरगर यांनी मानले.


0 Comments