खळबळजनक..सांगोल्यात हॉटेलमधील जेवणातून विद्यार्थ्यासह 12 जणांना विषबाधा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोलानजीक एका हॉटेलमधील जेवणातून 12 जणांना विषबाधा झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. विषबाधित 11 रुग्णांवर सांगोल्यातील दोन खासगी अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत,
तर एका फार्मसीच्या विद्यार्थ्यावर वैभववाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना कमलापूर (गोडसे वाडी, ता. सांगोला) हद्दीतील एका हॉटेलमध्ये घडली आहे. दरम्यान, याबाबत सांगोला पोलिसात रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, हॉटेल मालक आणि रुग्णांच्या नातेवाईकांत सामोपचाराने हा विषय मिटविण्यात आला.
चिणके (ता. सांगोला) गावातील 10 तरुण शनिवारी रात्री गोडसेवाडी हद्दीतील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी सर्वांनी जेवण केले. दरम्यान, रविवारी पहाटे 5 वाजेपासून सर्वांना एकामागोमाग एक असा जुलाब आणि उलटीच्या त्रास होऊ
लागल्यामुळे नातेवाईकांनी सर्वांना तातडीने सांगोला येथील दोन ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.


0 Comments