सांगोला पोलीसांची मोठी कारवाई अकोल्यात एक ब्रास वाळूसह लेलंड जप्त
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला - सांगेला पोलीस यांचेकडून अकोला (वासुद), ता.सांगोला येथे एक ब्रास वाळूसह लेलंड जप्त करण्यात आल्याची कारवाई
मंगळवार दि.२८ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी आदित्य चंद्रकांत गडहिरे रा.अकोला (वासुद),
ता.सांगोला हा मंगळवार दि.२८ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अकोला गावचे हद्दीमध्ये अकोला रोडने नदीपात्राकडे जात
असणा-या कच्चा रस्त्यावर त्याचे ताब्यातील पांढ-या रंगाचे अशोक लेलंड मध्ये शासनाची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता, परवानगी न घेता,
अवैद्यरित्या वाळुचा उपसा करून, त्याची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वाहनामध्ये बेकायदेशीरपणे वाहतुक करीत असताना मिळुन आला.
पोलीस वाहनाचे जवळ येत असल्याची चाहुल लागताच वाहन जागीच थांबवुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला.
सदर कारवाई मध्ये अशोक लेलंड कंपनीचे चारचाकी वाहन नं.एमएच १० बीआर ३५८७ व एक ब्रास वाळू असा एकूण ४ लाख ७ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोकों.मच्छिंद्र माळी यांनी सांगोला पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.


0 Comments