दादर –सातारा –दादर रेल्वे नियमित करून वेळेत बदल करा:– अशोक कामटे संघटना अशोक कामटे संघटनेच्या
रेल्वे सेवांच्या मागणीकरीता आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचाही पाठपुरावा.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना रेल्वेच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
प्रामुख्याने या निवेदनात 11027&11028 दादर– सातारा –दादर रेल्वे दररोज सुरू करण्यात यावी व दादर येथून सुटणाऱ्या वेळेत बदल करावा, सध्याची दादर येथून संध्याकाळी 11.55 ची वेळ प्रवाशांची फार गैरसोयीची व त्रासदायक आहे
त्यामध्ये सुधारित बदल करून ती रात्री 9.00 वाजता सोडण्यात यावी. अशी आग्रही मागणी अशोक कामटे संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे त्याचबरोबर
मिरज –सांगोला–पंढरपूर–शेगाव गजानन महाराज रेल्वे स्टेशनपर्यंत एक्सप्रेस रेल्वे सेवा दररोज सुरू करावी, पुणे –सांगली –जगन्नाथपुरी (ओडिशा)रेल्वे सांगोला,पंढरपूर, सोलापूर मार्गे सुरु करावी , बेंगलोर –नवी दिल्ली एक्सप्रेस
साप्ताहिक रेल्वे मिरज ,पंढरपूर मार्गे सोडावी, बेंगलोर –सांगली राणी चेन्नमा एक्सप्रेसचा रेल्वे विस्तार पंढरपूर स्टेशनपर्यंत करावा.सांगोला स्टेशनवर कोच इंडिकेटर सुविधा निर्माण कराव्यात.
रेल्वे क्र.01541 & 01542 कोल्हापूर– कलबुर्गी– कोल्हापूर स्पेशल रेल्वे नियमित करावी , सांगोला स्टेशनचा अमृत भारत योजनेत समावेश करावा.
वरील सर्व प्रवाशांच्या मागण्या मंजूर करण्याकरिता . खासदार धैर्यशील मोहिते– पाटील ,
मा.आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
मा. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर, पुणे यांनाही निवेदन देण्यात आले आहेत. आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनीही
याप्रश्नी प्राधान्याने या मागण्याकरिता स्वतंत्र शिफारस पत्र रेल्वे प्रशासनास दिले आहे यावेळी अशोक कामटे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट:–
पंढरपूर तीर्थक्षेत्र हे देशाचे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते भाविकांच्या सोयीकरिता संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून रेल्वे सोयी होण्याकरिता
अशोक कामटे संघटनेने अनेक रेल्वे सेवेचा विस्तार व इतर मागण्याकरीता निवेदन दिलेले आहे याबाबत रेल्वे प्रशासनेने सकारात्मक निर्णय घेतल्यास पर्यटक, भाविक भक्तांची, सर्व प्रवाशांची मोठी सोय होणार आहे .
निलकंठ शिंदे सर.
अध्यक्ष:–शहीद अशोक कामटे संघटना सांगोला


0 Comments