तिप्पेहाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपकआबा गटाच्या नंदाबाई बजबळकर यांची बिनविरोध निवड
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला ; तालुका प्रतिनिधी तिप्पेहाळी ता सांगोला ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच पदावर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
यांच्या गटाच्या नंदाबाई मारुती बजबळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवार दि 3 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय तिप्पेहाळी येथे ही निवड पार पडली.
गेल्या अनेक दिवसांपासून तिप्पेहाळी गावचे सरपंचपद रिक्त होते त्यामुळे सरपंच कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. शुक्रवारी पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच
पदासाठी नंदाबाई मारुती बजबळकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी
म्हणून मंडलाधिकारी गणेश टीके सहायक म्हणून गावकामगर तलाठी कोमल दौंड आणि ग्रामसेवक विजय कांबळे यांनी काम पाहिले. अत्यंत लक्षवेधी निवडणुकीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटाचा
झेंडा तिप्पेहाळी ग्रामपंचायतीवर फडकल्याने दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गाव परिसरात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून जयघोष आणि जल्लोष साजरा केला.
यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील गटाचे नेते शामराव बजबळकर, उपसरपंच बाबासाहेब नरळे यांच्यासह अनिता माने, दत्तात्रय नरळे, सुनील मोहिते, सुसाबाई नरळे,
तानाजी नरळे, रंजना बजबळकर, विशाल नरळे आदी सदस्यासह श्रीमंत नरळे, माजी सरपंच सोपान नरळे, तानाजी नरळे, सागर नरळे, संजय भुजबळकर, हरिदास बजबळकर, सावंत
बजबळकर, गोरख बजबळकर, पांडुरंग बजबळकर, नामदेव नरळे, अजय नरळे, हनुमंत नरळे, संतोष नरळे यांच्यासह माजी आमदार दिपकआबा आबा साळुंखे पाटील गटाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट ;
गावकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
तिप्पेहाळी गावातील ग्रामस्थांनी आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या गटाच्या नंदाबाई बजबळकर यांना बिनविरोध सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली. ग्रामस्थांनी ज्या अपेक्षांनी त्यांना संधी दिली आहे
त्या अपेक्षांना आणि ठेवलेल्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त विकासनिधी खेचून आगामी काळात गावचा चेहरा मोहरा बदलून टाकू
मा. दिपकआबा साळुंखे पाटील
माजी आमदार, सांगोला.


0 Comments