अमरसिंह दिपक ऐवळे सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर चा विद्यार्थी कराटे स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र शासन पुणे विभाग अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात
आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत सांगोला येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल कमलापुर चा विद्यार्थी अभय सिंह दीपक ऐवळे याने प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले असून या स्पर्धेसाठी
सोलापूर जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यातील संघ शाळा विद्यालय यांनी सहभाग नोंदवला या क्रीडा स्पर्धेचे रेफ्री म्हणून राष्ट्रीय पंच निजेंद्र चौधरी होते तर अभयसिंह दीपक अहिवळे यांना न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे वाघमारे कराटे क्लासेसचे प्रशिक्षण
देणारे सुनील वाघमारे गौतम वाघमारे श्रावणी वाघमारे व निजेन्द्र चौधरी यांच्याकडून प्रशिक्षण मिळाले तसेच सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूरचे क्रीडा शिक्षक गणेश पवार सर यांचे
मार्गदर्शन मिळाले त्याची पुढे विभागीय स्तरावर निवड करण्यात आली असून त्याच्या या यशाबद्दल सांगोला तालुक्यातून अभिनंदनचा वर्षा होत असून त्याला मान्यवरांनी भावी कार्यास खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत



0 Comments