google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...सांगोला नगरपरिषदसाठी ओबीसी आरक्षणामुळे वातावरण ढवळले'; कोण कोणाशी युती करणार?, शहरात राजकीय चर्चांना उधाण

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...सांगोला नगरपरिषदसाठी ओबीसी आरक्षणामुळे वातावरण ढवळले'; कोण कोणाशी युती करणार?, शहरात राजकीय चर्चांना उधाण

ब्रेकिंग न्यूज...सांगोला नगरपरिषदसाठी ओबीसी आरक्षणामुळे वातावरण ढवळले'; कोण कोणाशी युती करणार?, शहरात राजकीय चर्चांना उधाण


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सांगोला नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी जाहीर झाले असून, 

या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतरही कोण- कोणाशी युती करणार, याबाबत शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मागील नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील

 यांच्या गटातील राणीताई माने या ओबीसी प्रवर्गातील महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा झाल्या होत्या. त्यामुळे यावेळीही त्यांच्या गटाकडून माजी

 नगराध्यक्षा राणीताई माने यांचे पती आनंदा माने हे सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. यावेळी इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव झाल्याने माने यांचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र दिसत आहे.

 दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, तसेच हा पक्ष कोणासोबत युती करतो, की स्वतंत्र लढतो, याबाबतही शहरात चर्चांना जोर आला आहे. महायुतीतील सर्व पक्ष एकसंध राहतील का, याकडेही लक्ष लागले आहे.

युतीवरच चर्चा सुरू

सध्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले अनेकजण कामाला लागले आहेत. परंतु, सध्यातरी पक्षातील राजकीय हालचालींपेक्षा कोण कोणाबरोबर युती करतो, यावरच जास्त चर्चा होताना दिसून येत आहे.

महायुतीच्या बैठकीतच समजले आरक्षण

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच महायुतीतील शिवसेना, भाजप आणि आरपीआय या पक्षांच्या सांगोल्यात नगरपालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन सोमवारी (ता. ६) करण्यात आले होते. 

या बैठकीत आरक्षणाबाबत अंदाज बांधत इच्छुक आपली भूमिका स्पष्ट करीत होते. बैठकीतच नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे त्या भोवतीच बैठकीत चर्चा झाली.

 या बैठकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत तसेच अन्य महायुतीचे नेते उपस्थित होते. या घडामोडींमुळे सांगोला नगरपरिषद निवडणुकीचा राजकीय पट रंगतदार होणार, हे निश्चित झाले आहे.

Post a Comment

0 Comments