जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.
माजी दिपकआबा साळुंखे पाटील यांची सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्याकडे आग्रही मागणी.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला ; तालुका प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमधील गट सचिवांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून,
येणाऱ्या दीपावली सणानिमित्त तीन महिन्यांचा पगार बोनस स्वरूपात देण्यात यावा,
अशी ठोस मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे सहकारमंत्री मा. बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.
माजी दिपकआबा साळुंखे पाटील व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे स्नेहाचे संबंध पाहता सांगोला तालुक्यातील गट सचिवांनी अलीकडेच मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना समक्ष भेट घेऊन
लेखी पत्राद्वारे आपली मागणी सादर केली होती. या निवेदनात सचिवांनी पगार न मिळणे, उशिरा होणारे वेतन आणि वाढत्या महागाईमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा उल्लेख केला होता.
या मागणीला सकारात्मक दृष्टीकोनातून घेत मा.आमदार साळुंखे पाटील यांनी आज मुंबईत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. या भेटीत आबांनी गट सचिवांच्या समस्या आणि त्यांची आर्थिक स्थिती यांचे सविस्तर वर्णन केले.
ते म्हणाले की, “गट सचिव हा ग्रामविकासाचा आणि शेती अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांपासून ते ग्रामस्थांपर्यंत प्रत्येक आर्थिक व्यवहारात त्यांचा सहभाग असतो.
अशा परिस्थितीत, त्यांना वेळेवर पगार मिळत नाही ही अत्यंत खेदजनक बाब आहे. त्यामुळे या दीपावलीला
तीन महिन्यांचा बोनस देऊन त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळावा. मा.आमदार दिपकआबा यांच्या या सविस्तर मांडणीवर सकारात्मक प्रतिसाद देत सहकारमंत्री मा. बाबासाहेब पाटील यांनी तात्काळ जिल्हा उपनिबंधक,
सोलापूर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील गट सचिवांच्या सद्य परिस्थितीची माहिती घेऊन “त्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्यात यावा” अशा स्पष्ट सूचना दिल्या.
सहकारमंत्री आणि मा.आमदार यांच्या या संवादानंतर सोलापूर जिल्ह्यातील गट सचिवांमध्ये नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक सचिवांनी या विषयावर आवाज उठवून त्याची दखल घेणाऱ्या मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत.


0 Comments