google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहर धुळ,खड्डेमुक्त करा:–अशोक कामटे संघटना शहरात खड्यामुळे अपघात, धुळीमुळे आजार वाढले

Breaking News

सांगोला शहर धुळ,खड्डेमुक्त करा:–अशोक कामटे संघटना शहरात खड्यामुळे अपघात, धुळीमुळे आजार वाढले

सांगोला शहर धुळ,खड्डेमुक्त करा:–अशोक कामटे संघटना शहरात खड्यामुळे अपघात, धुळीमुळे आजार वाढले



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ( प्रतिनिधी) संपूर्ण सांगोला शहरात खड्डे व प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले असून यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी 

शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने  नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

प्रामुख्याने महात्मा फुले चौक ते नेहरू चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणावर रहदारी कायम असते येथील रस्ते पूर्णपने उखडल्याने येथील खडी व माती सतत वाहनांबरोबर उडत आहे, 

फुले चौकापासून नेहरू चौकापर्यंत रस्त्याचे अस्तित्व आहे का असा शहर वासियांना प्रश्न पडला आहे.? भले भुयारी गटारीमुळे रस्ते उखडलेले आहेत 

त्या कामाकरीता अजून 1 वर्ष तरी जाणार, पण एवढा काळ शहरवासीयांना त्रास सोसावा का त्यामुळे शहर वासियांचे आरोग धोक्यात आले आहे.परिणामी त्याचा बाजारपेठेवर परिणाम होत आहे.

10 दिवसावर दिवाळी सारखा मोठा सन आलेला आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व सामन्याची गर्दी शहरात खरेदी करिता पेठेत वाढत आहे , यावर संबंधित प्रशासन ठोस कार्यवाही करणार की धुळीचा सामना कायमस्वरूपी करावा लागणार.

या समस्येमुळे संपूर्ण शहरातील व्यापारी सतत स्वच्छता करून मेटाकुटीला आला आहे तसेच धुळीमुळे नागरिकात दमा ,श्वसनाचे आजार वाढत आहे, व खराब रस्त्यामुळेदेखील अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे,मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नगरपरिषदेने रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती व धूळ उडू नये याकरिता लवकरात– लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

चौकट :–

दिवाळी जवळ आली असल्याने आमच्या व्यवसायाचा हंगाम सुरु होत आहे पण शहरातील रस्त्याच्या धुळ,दुरावस्थेमुळे ग्राहक शहरात येण्याकरीता घाबरूत आहे व आमच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे, 

त्याचा बाजारपेठेवर परिणाम होत आहे.नगर पालिकेने लवकरच खड्डे, धुळ मुक्ती करिता उपाययोजना कराव्यात अन्यथा शहीद अशोक कामटे संघटनेसमवेत सर्व व्यापारी तीव्र आंदोलन करणार.

श्री. विजय कांबळे.

कापड  व्यासायिक व्यापारी, सांगोला

Post a Comment

0 Comments