बायकोचं लफडं असल्याचा संशय, विवाहित लेक भांडणं सोडवून झोपली, रात्रभरात बापाने 'होत्याचं नव्हतं' केलं! सोलापूर जिल्ह्यातील घटना..
सोलापूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची निर्घृण हत्या केली, त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे गुरुवारी रात्री अकरा ते पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
पत्नीच्या डोक्यावर रॉडने वार करुन पतीने तिच्या गळ्यावर खुरप्याने सपासप वार केले.
अंबिका अशोक अंबिगार (वय ४०) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे, तर अशोक सदाशिव अंबिगार (वय ४९, दोघेही रा.औराद) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
पती चारित्र्याचा संशय घेत असल्याने या दोघांत नेहमीच भांडणे होत असत. अशोक हे पत्नीला नेहमी ठार मारण्याची धमकी देत असत. अखेर पत्नीचा जीव घेऊन त्यांनी स्वतःही आत्महत्या केल्याच्या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे.
जेवताना वाद, मुलीने भांडण मिटवलं
अशोक अंबिगार हे ट्रक चालवून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत असत. आपली पत्नी अंबिका हिच्या चारित्र्यावर ते नेहमी संशय घेत
असल्याने दोघांत नेहमीच भांडणं होत असत. गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पत्नी अंबिका अंबिगार, पती अशोक अंबिगार, मुलगी सिध्दव्वा, सुजाता,
मुलगा शेखर असे सर्वांनी मिळून जेवण केलं. यावेळी अंबिका आणि अशोक यांच्यात याच विषयावरून पुन्हा वादविवाद होऊ लागला. तेव्हा मुलगी सिध्दव्वा कोळी हिने दोघांनी भांडणं करू नये असे सांगितले.
आईला सकाळी उठवण्यासाठी मुलगी गेली अन् पायाखालची जमीन सरकली
सिध्दव्वा कोळी हिचे पती परगावी गेल्याने बहीण सुजाता आणि भाऊ शेखर यांना सोबत घेऊन ती आपल्या घरी झोपण्यासाठी गेली होती.
यावेळी अंबिका आणि अशोक हे दोघे पती पत्नी आपल्या घरातच झोपले होते. रोज सकाळी अंबिका आणि मुलगी सिध्दव्वा हे प्रातःविधीस एकत्र जात
असल्याने सिध्दव्वा आईला बोलाविण्यासाठी गेली होती. घराला आतून कडी असल्याने सिध्दव्वाने आई, वडिलांना आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद मिळत नसल्याने घाबरून सिध्दव्वा हिने दरवाजाच्या बाजूस असलेला
पत्रा वाकवून आतमध्ये पाहिले असता अशोक यांनी घराच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती तर खाली फरशीवर आई अंबिका निपचित पडलेल्या दिसून आल्या.
पत्नीला ठार करून आत्महत्या केली
यावेळी अंबिका यांच्या डोक्याजवळ रक्त पडलेले दिसले. तेव्हा त्यांनी घाबरून आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूला असलेले ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर तेथे जमलेल्या लोकांनी पत्रा बाजूला
केल्यानंतर दरवाजाची कडी काढली. यावेळी अंबिका अंबिगार या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या त्यांच्याशेजारी खुरपे आणि रॉड पडलेला दिसून आला. घरातील किचन कट्ट्याच्या बाजूला
अशोक अंबिगार पत्र्याच्या लोखंडी अँगलला पायाखाली पिठाचा डबा ठेवून दोरीने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसले. या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील सैपन बेगडे यांनी मंद्रूप पोलिसांना कळवण्यात आली.


0 Comments