google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नुकसानीची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यामुळे नाझरा मंडलमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरु होणार

Breaking News

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नुकसानीची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यामुळे नाझरा मंडलमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरु होणार

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नुकसानीची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यामुळे नाझरा मंडलमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरु होणार


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (तालुका प्रतिनिधी):  आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नाझरा मंडलमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची 

वस्तुस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अखेर नाझरा मंडलमध्ये देखील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु होणार आहेत. 

नाझरा मंडल मधील अनेक शेतकऱ्यांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशा सूचना आपण प्रशासनाला द्यावे अशी मागणी केली.

तसेच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सर्व भागात भेटी देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती.  त्यानंतर त्यांनी प्रशासनाला सक्त सूचना देत शेतकरी बांधवांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी आवाहन केले होते. 

आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सूचनेनंतर  तहसीलदार यांनी प्रत्यक्ष नुकसान ग्रस्त भागास भेट देऊन

  वस्तुस्थितीची पाहणी केल्यानंतर अखेर नाझरा मंडल मधील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई चे प्रस्ताव दाखल करण्याचा आदेश करण्यात आला.

 त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार  असल्यामुळे शेतकऱ्यांमधून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे अभिनंदन होत असून आनंद व्यक्त केला जात आहे.

नाझरा मंडल मध्ये  अतिवृष्टीमुळे परिसरातील संपूर्ण शेत शिवार व पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते.  मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील नाझरा मंडलचा 

 नुकसानीचे पंचनामे व नुकसान भरपाई मध्ये समावेश करण्यात आला नव्हता. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या प्रक्रियेत  नाझरे हे मंडळे वगळले होते.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता.

 अखेर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सूचनेनंतर नाझरा मंडल मधील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई चे प्रस्ताव दाखल करण्याचा आदेश करण्यात असल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे

Post a Comment

0 Comments