google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील १० मंडलांचा अतिवृष्टीत समावेश ; तालुक्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे पचनामे होणार व शासनाची मदत मिळणार : तहसीलदार संतोष कणसे

Breaking News

सांगोला तालुक्यातील १० मंडलांचा अतिवृष्टीत समावेश ; तालुक्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे पचनामे होणार व शासनाची मदत मिळणार : तहसीलदार संतोष कणसे

सांगोला तालुक्यातील १० मंडलांचा अतिवृष्टीत समावेश ;


तालुक्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे पचनामे होणार व शासनाची मदत मिळणार : तहसीलदार संतोष कणसे

अतिवृष्टीग्रस्त नाझरा मंडलचा अखेर समावेश 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/ प्रतिनिधी :( दशरथ बाबर) सांगोला तालुक्यात महूद, शिवणे, सांगोला, संगेवाडी, जवळा, सोनंद, घेरडी, कोळा, हातिद,नाझरा या मंडलांचा समावेश होतो.

 सांगोला तालुक्यात सप्टेंबर महिन्यात ढगफुटी सदृश्य,अतिवृष्टी,मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या डाळिंबासह इतर फळबागांचे तसेच भाजीपाला व खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे 

सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे .तसेच शेतीवर अवलंबून असणाऱ्या कामगारांना व रोजगार करणाऱ्या कामगारांनाही या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला त्यामुळे

 शेतकऱ्यांसह कामगारावरती उपासमारीची वेळ आली आहे. 30 सप्टेंबर रोजी नाझरा मंडल मधील झालेल्या नुकसानी बाबत चोपडी येथील शेतकरी बांधवांनी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी नुकसानीबाबत 

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांना नुकसानीबाबत माहिती दिली.  तसेच तहसीलदार संतोष कणसे व तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांना भेटून

 नुकसानीबाबत सर्व माहिती दिली. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत बुधवार दिनांक १ ऑक्टोबर  रोजी तहसीलदार संतोष कणसे यांनी चोपडी येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. 

यावेळी तहसीलदार संतोष कणसे यांनी नाझरा मंडलचा अतिवृष्टीमध्ये समावेश झाला असल्याचे जाहीर करीत शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी महसूल प्रशासन व कृषी प्रशासनाला सूचना दिल्या. 

सांगोला तालुक्यातील सर्वच्या सर्व १० मंडलचा अतिवृष्टीमध्ये समावेश झाला असून तालुक्यातील नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यापासून व मदतीपासून वंचित राहणार नाही असे तहसीलदार संतोष कणसे यांनी जाहीर केले. 

तहसीलदार संतोष कणसे यांनी चोपडी येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व प्रशासनाला शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी नाझरा मंडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव,

 सहाय्यक कृषी अधिकारी समाधान गवळी, तलाठी लिंगराज आलदर यांच्यासह चोपडी गावातील सर्वपक्षीय नेते मंडळी, पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments