सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
यांच्याकडून अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १ महिन्याचे वेतन मदत म्हणून देण्यात आले
(शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे विशेषतः मराठवाडा व विदर्भासह सोलापूर जिल्ह्यातील
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी
आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीत १ महिन्याचे वेतन दिले आहे. हे पैसे अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या पुनर्वसन व मदतीसाठी वापरले जातील, असे आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून,
घरे उध्वस्त झाली आहेत. सांगोला तालुक्यातही अतिवृष्टी मुळे बरीच गावे प्रभावित झाली आहेत. शेतकऱ्यांचे पिके नष्ट झाले
असून, पशुधनाला मोठा फटका बसला आहे. यामुळे शासनाने अतिवृष्टीग्रस्तांसाठी तातडीची मदत जाहीर केली असून, मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ४ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा संकटकाळात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सामाजिक जबाबदारीची जाण ठेवत मुख्यमंत्री सहायता निधीत वाटा उचलला.यावेळी बोलताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले,
“सांगोला तालुक्यातील शेतकरी व पूरग्रस्त कुटुंबां सोबत मी नेहमीच असतो. ही अतिवृष्टी ही नैसर्गिक आपत्ती असली तरी त्याचा सामना एकत्रितपणे करायचा आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीत दिलेले हे वेतन पूरग्रस्तांच्या घरपुनर्रचना व शेती पुनर्वसनासाठी उपयुक्त ठरतील. तसेच त्यांनी स्थानिक प्रशासनाला तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश दिलेले आहेत.
मुख्यमंत्री सहायता निधी हा राज्यातील विविध आपत्ती व सामाजिक मदतीसाठी वापरला जाणारा महत्त्वाचा निधी आहे. गेल्या काही वर्षांत या निधीतून कोविड, पूर व दुष्काळग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या या निर्णयाने स्थानिक शेतकरी व नागरिकांनी स्वागत केले असून,हे योगदान सांगोला मतदारसंघातील प्रत्येकापर्यंत पोहोचेल असे मत व्यक्त केले आहे.
या मदतीमुळे सांगोला तालुक्यातील पूरग्रस्तांना दिलासा मिळेल. शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी विविध कागदपत्रांची यादी जाहीर केली असून, शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करावेत, असे आवाहन आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.


0 Comments