google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात डॉल्बी व डीजे मुक्त गणेशउत्सव साजरा: पोलीस निरीक्षक विनोद घुगे महूद गावाने केले सूचनांचे पालन; डॉल्बी मुक्त गणेशउत्सव साजरा

Breaking News

सांगोला तालुक्यात डॉल्बी व डीजे मुक्त गणेशउत्सव साजरा: पोलीस निरीक्षक विनोद घुगे महूद गावाने केले सूचनांचे पालन; डॉल्बी मुक्त गणेशउत्सव साजरा

सांगोला तालुक्यात डॉल्बी व डीजे मुक्त गणेशउत्सव साजरा: पोलीस निरीक्षक विनोद घुगे महूद गावाने केले सूचनांचे पालन; डॉल्बी मुक्त गणेशउत्सव साजरा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला : कोणत्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय व घरगुती कार्यक्रमात वाजणाऱ्या डॉल्बी-डीजेच्या विरोधात विद्यार्थ्यांपासून 

ज्येष्ठ नागरिक व डॉक्टरांपर्यंत सर्वच समाजाचा जनक्षोभ निर्माण झाल्यामुळे चालू वर्षी महूद परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुका पारंपारिक वाद्यांच्या गजरात व उत्साहात पार पडल्या.

कर्णकर्कश डॉल्बी-डीजे विरोधात पोलीस प्रशासनाने ठोस भूमिका घेतल्याने बँड, हलगी,लेझीम पथक अशा पारंपारिक वाद्यांना पसंती व मोठी मागणी वाढल्याचे दिसून आले. 

महूद गावाने डॉल्बी मुक्त गणेशोत्सव केला साजरा. अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली

डॉल्बी-डीजेच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रभर एकाचवेळी नागरिकांचा मोठा उठाव झाल्याचे चित्र महिनाभर आधी पासून पहावयास मिळाले.ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी,वकील,डॉक्टर आदी सर्वच समाज घटकांनी

 या कर्णकर्कश आवाजाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अधोरेखित करत यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी प्रशासनाकडे केली.त्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस प्रमुख, विभागीय पोलीस अधिकारी, 

पोलीस निरीक्षक अशा सर्वांकडे हा विषय लावून धरला. यामुळे जिल्ह्याच्या व राज्याच्या ग्रामीण भागातही जनता जागृत झाली. डॉल्बी- डीजे च्या विरोधात तक्रार करण्यासाठी नागरिक पुढे येऊ लागले.

डीजे विरोधातील जनभावनेमुळे या व्यवसायाशी संबंधित अनेकांनी गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी डीजे लावण्यास नकार दिला. एवढी वातावरण निर्मिती झाल्यानंतर सुद्धा जिल्ह्याच्या काही भागात काही गणेश मंडळांनी मुद्दामहून डॉल्बी-डीजे लावण्याचा प्रयत्न केला.

 मात्र पोलीस प्रशासनाने योग्य वेळी निर्भीड कारवाई करत अशा गणेश मंडळ कार्यकर्त्यांचे मनसुबे उधळून लावले. सांगोल्यातही. नियम मोडणाऱ्या मंडळावर व कार्यकर्त्यावर कारवाई करण्यात आली आहे.

काही ठिकाणी राजकीय नेत्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अशा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा डीजे बाबतचा मुद्दा पोलीस प्रशासनाकडे लावून धरण्याचा छुपा प्रयत्नही केला. मात्र यास फारसे यश आले नाही. 

यामुळे एकंदरीत यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुका अतिशय शिस्तबद्ध व शांततेत पार पडल्या. प्रशासनाच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत चिकमहूद येथील शंभूराजे गणेश तरुण मंडळाने श्री ची विसर्जन मिरवणूक डॉल्बी,डीजे विरहित 

हालग्यांच्या कडकडाटात काढली. परिसरातील छोट्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन यानिमित्ताने केले होते. शिवाय सर्वांसाठी महाप्रसाद ठेवला होता. यासाठी मंडळाचे मयूर कदम,

प्रवीण कदम,रणजीत पाटील, स्वप्निल महारनवर,प्रशांत भोसले,सचिन भोसले,सुरज यादव,अमोल कदम, कुलदीप भोसले, वैभव कदम,अंकुर कदम,सोन्या कदम,धीरज भोसले,प्रवीण जाधव,रावसाहेब कदम आदींनी परिश्रम घेतले. 

चौकट १) सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश स्थापना ते विसर्जन मिरवणूक कालावधीत डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा 

करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस भूमिका व पावले उचलली.गणेश उत्सवापासून डीजे मुक्तीची सुरुवात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना प्रथम गणेशाची पूजा केली जाते.

 सर्वसामान्य जनतेच्या मानगुटीवर बसलेले डीजे स्वरूपी भूत हटविण्याची सुरुवातही गणेशोत्सव काळात झाली आहे.डीजे मुक्तीची सुरुवात गणेशापासून करण्यात आली आहे. 

डीजे मुक्तीच्या शुभकार्याची सुरुवात गणेशोत्सवापासून झाली आहे.मात्र हा डीजे कोणत्याही कार्यक्रमात वाजू नये यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि पोलीस प्रशासनाची ठोस भूमिका भविष्यात निर्णायक ठरणार आहे.

चौकट २) गुलालाविना मिरवणूक - पारंपारिक वाद्य व पारंपारिक वेषातील मिरवणुकीचे आकर्षण येथील नवीपेठ गणेशोत्सव तरुण मंडळाने विसर्जन मिरवणूक पारंपारिक पद्धतीने काढली.

या मंडळाच्या असंख्य कार्यकर्त्यांमध्ये काही मुस्लिम कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.गेल्या अनेक वर्षापासून हे मंडळ आकर्षक विद्युत रोषणाईसाठी परिचित आहे. 

मंडळाच्या वतीने गतवर्षी तिरुपती बालाजी मंदिर तर यावर्षी जगन्नाथ पुरी मंदिराचा देखावा आकर्षक विद्युत रोषणाईतून साकारला होता. नवीपेठ गणेश मंडळ व नागराज प्रतिष्ठान यांच्यावतीने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.

तसेच महाप्रसादाचाही कार्यक्रम होतो आहे. नवीपेठ गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी पायजमा,शर्ट,टोपी असा खास महाराष्ट्रीयन पोशाख केला होता.

बँड या पारंपरिक वाद्याच्या गजरात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा अजिबात वापर केला नाही.शिवाय या मिरवणुकीत मद्यपान करून सहभागी होण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.

त्यामुळे या मंडळाच्या श्रीची विसर्जन मिरवणूक खास वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे.

Post a Comment

0 Comments