google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अमित पाटील यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख पदी निवड

Breaking News

अमित पाटील यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख पदी निवड

अमित पाटील यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख पदी निवड


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला प्रतिनिधी:- राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय खासदार मा.ना. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या 

नेतृत्वाखाली हिंदुहृदसमाट बंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी मा.अमित हणमंत पाटील यांची ६ महिन्या करीता निवड करण्यात येत आहे.

अमित पाटील यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख पदी निवड.

सोलापूर येथे शिवसेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख अमित पाटील यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मा.मंगेशजी चिवटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत (१०%) राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णतः 

मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्या संदर्भातील मदत तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे.

गंभीर व महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे या करीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी,

श्री. सिध्दिविनायक गणपती मंदौर ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर जिल्हाप्रमुख अमित पाटील यांच्याशी 9890269987 संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments