google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात सहा मंडळांसह १० जणांवर गुन्हा दाखल

Breaking News

सांगोल्यात सहा मंडळांसह १० जणांवर गुन्हा दाखल

सांगोल्यात सहा मंडळांसह १० जणांवर गुन्हा दाखल


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०२८२८४६४७)

सांगोला तालुक्यातील घेरडी येथे चार तसेच सांगोला वाडेगावसह तीन गावातील सहा गणेश उत्सव मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे 

सिस्टिम व लेझर लाईट शोचा वापर केल्याने १० व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा चारचाकी वाहनांची यात समावेश आहे.

गणेश विसर्जनप्रसंगी घेरडी येथील मुख्य चौकातील चार मंडळांतील अमोल दामाजी पाटील (रा. कुंभारी , ता. जत ) , संकेत ढवळे (रा. मंगळवेढा ), सौरभ खामकर (रा. नारायणगाव , ता. शिरूर ),

 विशाल निळे (रा. पारे ,ता. सांगोला ) तसेच सांगोला येथील राजू बोत्रे , अण्णा ऐवळे व वाडेगाव येथील समाधान शिवाजी मंडले (रा. करगणी , ता. आटपाडी ), अतुल गौतम माने, 

विजय विलास लोकरे , कुमार गणपत शिनगारे (तिघेही रा. वाडेगाव , ता. सांगोला ) यांनी गणेश उत्सव मिरवणुकीत डॉल्बी सिस्टिम व लेझर लाईट शोच्या वापरास बंदी घातली आहे. असे असतानाही त्याचा वापर केला,म्हणून घेरडी येथील चार मंडळांवर 

पोलीस कर्मचारी रवींद्र साबळे तसेच सांगोला येथील पोलीस कर्मचारी अमोल वाडकर व वाढेगाव येथील पोलीस हवालदार विलास बनसोडे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात सहा चारचाकी वाहनांसह दहा व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

 तालुक्यात प्रथमच डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट शोबाबत गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे तालुक्यातील गणेश उत्सव मंडळ व डीजे सिस्टिम वाले यांचे धाबे दणाणले आहे.

Post a Comment

0 Comments