google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पंचायत समितीच्या इमारत व निवासस्थान बांधकामासाठी निधी देण्याची मागणी - चेतनसिंह केदार सावंत -

Breaking News

सांगोला पंचायत समितीच्या इमारत व निवासस्थान बांधकामासाठी निधी देण्याची मागणी - चेतनसिंह केदार सावंत -

सांगोला पंचायत समितीच्या इमारत व निवासस्थान बांधकामासाठी निधी देण्याची मागणी - चेतनसिंह केदार सावंत 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम होऊन ६० वर्षांचा कालावधी झाल्याने सदरची इमारत जीर्ण झाली आहे. अधिकारी,

 कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सांगोला पंचायत समितीचे इमारत बांधकाम आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी मंजूर करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी

 ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या निवेदनाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला 

असून लवकरात लवकर निधीची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच सदर बांधकामाचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

सांगोला पंचायत समिती इमारतीचे बांधकाम १९६५ पूर्वी झाले असून याच इमारतीत ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना आखल्या जात आहे. दरम्यान ६० वर्षाहून अधिक कालावधी झाल्याने पंचायत समितीची इमारत जीर्ण झाल्याने धोकादायक झालेली आहे. 

अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन कामकाज करावे लागत आहे. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरावस्था झाल्याने निवासस्थानात राहण्यात अधिकारी कर्मचारी तयार नाहीत.

त्यामुळे ग्रामीण विकासाचा पाया असलेल्या सांगोला पंचायत समितीच्या इमारत बांधकामासाठी आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी देण्याची मागणी 

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

या निवेदनाची दखल घेऊन पालकांत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

Post a Comment

0 Comments