खळबळजनक...बोगस बिनशेती करून अशांक चांदणे यांनी फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल बोगस बिनशेती करून अनेकांना
प्लॉटची विक्री करून कोट्यावधी रूपयांचा गंडा घालून शेकडो जणांची फसवणुक
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील वासुद हद्दीतील शेतजमिनीचे बनावट बिगरशेती आदेश तयार करून, त्याच आधारे जमीन निवासी दाखवून
अनेकांना प्लॉट विक्री करून कोट्यावधी रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी अशांक बाळकृष्ण चांदणे यांच्यावर सांगोला पेालीसात गुन्हा दाखला झाला आहे. अनेकांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील वासुद येथील गट क्रमांक 150/2 व 148/2 या शेतजमिनींसंदर्भात तहसील कार्यालय सांगोला येथे बिगरशेती आदेश मंजूर झाल्याचे भासवण्यात आले.
मात्र तहसील कार्यालय व भूमिअभिलेख कार्यालयाकडून लेखी मागणी केली असता, सदर आदेश अभिलेखावर अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. सांगोला तहसिल कार्यालयाकडून अशांक बाळकृष्ण चांदणे यांना गट नं. 148/2 व 150/2 या
जमिनीचा बिनशेती आदेश दिला नाही असे लेखी पत्र दिले आहे. हा बनावट बिनशेती आदेशाचा फेरफार नंबर ही बोगस आहे. व या आदेशाचा आवक-जावक क्रमांक ही बोगस आहे. या जागेची बिनशेती, हद्दकायम मोजणी झालेली नाही.
2005 ते आज पर्यंत उपअधिक्षक भुमिअभिलेख कार्यालयात या जागेच्या संदर्भात कोणतेही मोजणीसाठी शासकीय चलन भरलेले नाही. अशांक बाळकृष्ण चांदणे याने अनेक प्लॉट व जमिनीमध्ये नागरिकांची फसवणुक केल्याचे उघड झाले आहे. ं
हाताने नकाशे काडून, ले आऊट असल्याचे भासवून खरेदी दस्त केले आहेत. जागेमध्ये रस्ते सोडले नाहीत. अशांक बाळकृष्ण चांदणे याने शेकडो जणांची व शासनाचीही फसवणुक केली आहे.
चार महिन्यापुर्वी अखिल भारतीय डाळींब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांच्या पत्नी व मुलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. चांदणे कुटूंबीय फसवणुकीत अग्रेसर असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
अशांक चांदणे यांनी खोटे व बनावट बिगरशेती आदेश तयार करून, त्याचा दाखला दाखवत जमीन निवासी असल्याचा भास निर्माण केला. त्यानंतर सदर जमीन खरी असल्याचा विश्वास संपादन करून,
फिर्यादीसह सतिश रावसाहेब सावंत (रा. सावंतवस्ती, सांगोला) आणि राहुल शिवलाल बंदपट्टे (रा. सांगोला) यांना ती जमीन विक्री करण्यात आली. अशांक बाळाकृष्ण चांदणे याने या बनावट बिनशेती आदेशाच्या आधारे शेकडो जणांना प्लॉट विक्री केले आहेत.
या एकाही खरेदी दस्ताला मंजुर लेआऊट जोडलेला नाही. किंवा रस्ते सोडल्याचा नकाशा जोडलेला नाही. अनेकांची फसवणुक करणारा हा अशांक बाळकृष्ण चांदणे याने यापुर्वी अनेक जणांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
सांगोला औद्योगिक वसाहतीचा तत्कालीन चेअरमन असणारा अशांक चांदणे याने औद्योगिक वसाहतीत सुध्दा अनेकांची फसवणुक केली आहे. त्याचबरोबर स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुध्दा बनावट कागदपत्रे जोडली आहेत.
अशांक बाळकृष्ण चांदणे याला यापुर्वी न्यायाधीशांनी काही प्रकरणात शिक्षा ही ठोठावली आहे. या अशांक बाळकृष्ण चांदणे याने विटा मर्चंट को. ऑ. बँकेचे गहानखत न करता सातबारा उतार्यावर बोजे चडवून अनेकांची फसवणुक केली आहे.
या प्रकरणातही गुन्हे दाखल होणार आहेत. अनेक राजकीय नेत्यांचा राजाश्रय घेवून अशांक बाळकृष्ण चांदणे याने अनेकांची फसवणुक केली आहे. राजकीय नेत्यांचा दबाव आणून व काही नातेवाईकांचा दबाव
आणून अधिकार्यांना हाताशी धरून अनेकांची फसवणुक करणार्या या अशांक बाळकृष्ण चांदणे याचे पितळ उघडे पडले आहे. अशांक बाळकृष्ण चांदणे याने वासुद हद्दीत व सांगोला शहरात जे बिनशेती, गुुंठेवारीचे आदेश करून
अनेकांची फसवणुक केली आहे ते सर्व लवकरच दाखल होतील. प्रत्येक फसवणुक झालेल्या व्यक्तीने कागदपत्रांची चौकशी करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामध्ये हे आदेश बनावट असल्याचे निष्पन्न होत आहे.
खरेदी दस्त व आर्थिक व्यवहार
या बनावट आदेशांच्या आधारे गट क्रमांक 150/2 मधील 1 हेक्टर 32 आर व गट क्रमांक 148/2 मधील 95.75 आर जमीन
खरेदी दस्त क्रमांक 1070/2021 दिनांक 22 फेब्रुवारी 2021 रोजी विक्री करण्यात आली. त्याबदल्यात तब्बल 43 लाखांची रक्कम देण्यात आल्याचे नोंद आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
सांगोला पोलीस ठाण्यात ऋखठ क्र. 733/2025 नोंदविण्यात आला असून या प्रकरणात भारतीय दंड संहितेतील कलम 420 (फसवणूक), 467 (बनावट कागदपत्र),
468 (फसवणुकीसाठी बनावट कागदपत्र) व 471 (खोटे कागदपत्र वापरणे) अशा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋखठ नुसार गुन्ह्याची घटना 10 फेब्रुवारी 2021 ते 22 फेब्रुवारी 2021 या कालावधीत घडली आहे.
पोलीस ठाण्यात माहिती मिळाल्यानंतर 8 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:06 वा. गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबासाहेब पाटील करीत आहे.
चौकट ः अशांक चांदणेकडून अनेकांची फसवणूक
अशांक चांदणे याने बर्याचठिकाणी बोगस बिनशेती करू अधिकार्यांच्या बनावट सह्या करून मोजणी व ले आऊट मंजूर न करता अनेकांना प्लॉट विक्री करून कोट्यावधींचा गंडा घातला आहे.


0 Comments