एस.टी. आगार व्यवस्थापकाचा मुजोरपणा खपवून घेणार नाही : चंद्रकात सरतापे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
विद्यमान लोकप्रतिनिधींना कार्यक्रमासाठी निमंत्रण न दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी; एस.टी. आगाराच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह
सांगोला: राज्य परिवहन एस.टी. आगारात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींना डावलल्यामुळे तालुक्यात संतापाची लाट पसरली
असून एस.टी. आगाराचे व्यवस्थापकाचा मुजोरपणा या पुढे खपवून घेणार असल्याचे प्रसिध्दी प्रमुख चंद्रकात सरतापे यांनी सांगितले.
स्थानिक लोकप्रतिनिधी हे मतदारसंघातील जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असून, त्यांना अशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेणे अपेक्षित आहे.
मात्र, एस.टी. आगाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “लोकप्रतिनिधींना निमंत्रण न देणे म्हणजे जनतेच्या भावनांचा अनादर आहे.
आगाराचे अधिकारी नेमके काय लपवत आहेत?” असा सवाल उपस्थित करून या गंभीर प्रकाराबाबत संबंधित विभागाचे मंत्री महोदय यांच्याकडे लवकरच तालुक्याचे शिष्ट मंडळ भेटीसाठी जाणार आहे.
एसटी बस स्थानकांवरील मनमानी कारभाराच्या बातम्यांमध्ये बस वेळेवर न सोडणे, नादुरुस्त बस चालवणे, प्रवाशांना सोयीनुसार थांब्यावर न थांबवणे आणि आगारातील अधिकारी प्रवाशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात, असा एक ना अनेक
तक्रारी वारंवार लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी येत होत्या. लोकप्रतिनिधी या तक्रारींची त्वरित दखल घेऊन प्रश्न मार्गी लावत असल्यामुळे आगार प्रमुखांच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत
असल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि समन्वयावर शंका व्यक्त केली जात आहे.त्यामुळेच असे उद्योग सुरू असल्याचा आरोप देखील.चंद्रकात सरतापे यांनी केला.
याबाबत स्थानिक एस.टी. आगाराचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतेही ठोस उत्तर देण्यास नकार दिला.
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निमंत्रण न देण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेण्यात आला असावा मात्र यामागे अधिकारी वर्गावर राजकीय दबाव असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी आगार प्रशासनाकडून त्वरित खुलासा करून ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला आहे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
परिवहन मंत्री यांच्याकडे करणार असल्याचे भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले.


0 Comments