google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लोटेवाडी ता.सांगोला दलीत वस्तीचा निधी इतरत्र वापरल्याने लोटेवाडी गावचे दादासाहेब सावंत यांचे सोलापूर जिल्हा परिषद समोर बेमुदत अन्नत्याग व पाणी त्याग आमरण उपोषण

Breaking News

लोटेवाडी ता.सांगोला दलीत वस्तीचा निधी इतरत्र वापरल्याने लोटेवाडी गावचे दादासाहेब सावंत यांचे सोलापूर जिल्हा परिषद समोर बेमुदत अन्नत्याग व पाणी त्याग आमरण उपोषण

लोटेवाडी ता.सांगोला दलीत वस्तीचा निधी इतरत्र वापरल्याने लोटेवाडी गावचे


दादासाहेब सावंत यांचे सोलापूर जिल्हा परिषद समोर बेमुदत अन्नत्याग व पाणी त्याग आमरण उपोषण

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

लोटेवाडी ता.सांगोला या गावी तात्कालिक सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने दलीत वस्तीचा निधी इतरत्र खर्ची केला असुन .त्याबाबत या पुर्वी रीतसर तक्रारी दाखल केल्या आहेत.

  या आगोदर या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी श्री दादासाहेब सावंत यांनी आंदोलन केले होती.त्या आंदोलनाची दखल घेऊन थातुरमातुर चौकशी करण्यात आली.

जर दलीत वस्तीचा निधी सरपंच व ग्रामसेवक यांनी जर संगनमताने इतरत्र खर्ची केला आहे त्याचे प्रबळ पुरावे आसताना.सदर प्रकरणाची चौकशी ही राजकीय दबावामुळे योग्य पध्दतीने झाली नाही.

सदर प्रकरणी तात्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी लोटेवाडी गावचे दादासाहेब सावंत हे सोलापूर जिल्हा परिषद समोर आमरण अन्नत्याग व पाणी बेमुदत उपोषणास बसले आहेत.

  सदर प्रकरणाचे पुरावे मा.मुख्यमंत्री साहेब व सामाजिक न्याय मंत्री व विरोधी पक्षनेते यांना पाठवण्यात आले आहेत.सदर प्रकरणी योग्य ती निःपक्षपाती चौकशी करुन मागासवर्गीय समाजा निधी इतरत्र खर्ची करणारे तात्कालीन

 सरपंच व ग्रामसेवक यांना कठोर कारवाई केली जात नाही तो पर्यंत मी अन्नत्याग व पाणी त्याग आंदोलन सुरुच ठेवणार आहे असे उपोषणकर्ते दादासाहेब सावंत यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments