google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात १० शिबीरांचे आयोजन जात, रहिवास, उत्पन्न असे विविध शासकीय दाखल्यासाठी दि २४ सप्टेंबर २०२५ या दिवशी शिवीरांचे आयोजन मा.श्री. संतोष कणसे तहसिलदार

Breaking News

सांगोला तालुक्यात १० शिबीरांचे आयोजन जात, रहिवास, उत्पन्न असे विविध शासकीय दाखल्यासाठी दि २४ सप्टेंबर २०२५ या दिवशी शिवीरांचे आयोजन मा.श्री. संतोष कणसे तहसिलदार

सांगोला


तालुक्यात १० शिबीरांचे आयोजन जात, रहिवास, उत्पन्न असे विविध शासकीय दाखल्यासाठी दि २४ सप्टेंबर २०२५ या दिवशी शिवीरांचे आयोजन मा.श्री. संतोष कणसे तहसिलदार

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुक्यामध्ये १० मंडळ स्तरावर जात, रहिवास, उत्पन्न असे विविध शासकीय दाखल्यासाठी दि २४ सप्टेंबर २०२५ या दिवशी शिवीरांचे आयोजन केले आहे. अशी माहिती मा.श्री. संतोष कणसे तहसिलदार सांगोला यांनी दिली. 

महसूल विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत हा उपक्रम सुरु केला आहे. सदर शिबीरात भटक्या विमुक्त जमाती व अनुसुचित जमाती मधील नागरिकांसाठी जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, 

अधिवास दाखले इत्यादीचे वाटप करण्याचावत विशेष भर दिला जात आहे. तसेच यात शिवीरात तृतीय पंथीय एकल पद्धतीने

 राहणान्या महिला त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील खियांसाठी महिलासाठी सामाजिक

 न्याय विभागाच्या संजय गांधी योजना व इंदिरा गांधी अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज भरुन घेतले जाणार आहेत. अशा लाभार्थ्यांनी सदर योजनेत अर्ज भरून देण्याचावत हो आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन अंतर्गत सांगोला तालुक्यातील जनतेसाठी सुलभ पध्दतीने विविध प्रकारचे दाखले मिळण्यासाठी दरवर्षी दाखल्यांसाठी होणारा विलंब तहसिल कार्यालयात होणारी

 गर्दी व वेळेवर दाखले न मिळाल्याने विद्यार्थ्यांना होणारा त्रास या पार्श्वभुमीवर शिवीर घेतली जात आहेत. सदर शिवीर मंडळ स्तरावर २० ठिकाणी आयोजित केले आहे. ते खालीलप्रमाणे,

मंडळाचे नांव, शिबीराचे ठिकाण २४/०९/२०२५रोजी

कोळा विद्यामंदिर हायस्कूल कोळा,

नाझरा विद्यामंदिर हायस्कूल नाझरा,

शिवणे ग्रामपंचायत कायर्यालय (वर्कशेड) शिवणे , जवळा जि.प. प्रा. मुलांची शाळा जवळ , हातिद श्रीराम विदयालय हातिद,

संगेवाडी ग्रामपंचायत हॉल संगेवाडी,

ग्रामपंचायत कार्यालय घेरडी, सांगोला इंग्लिश स्कूल सांगोला महूद बु., ग्रामपंचायत कार्यालय (सभागृह) महूद बु. , सोनंद अंबिका मंदिर तलाठी कार्यालय जवळ सोनंद

तरी सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी सदर शिबीरांचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार सांगोला यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments