google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! बहिणीकडे निघालेला मंगळवेढ्यातील भाऊ ठार; भाच्याने मामाला रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वी झाला मृत्यू सांगोला तालुक्यातील घटना..

Breaking News

धक्कादायक! बहिणीकडे निघालेला मंगळवेढ्यातील भाऊ ठार; भाच्याने मामाला रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वी झाला मृत्यू सांगोला तालुक्यातील घटना..

धक्कादायक! बहिणीकडे निघालेला मंगळवेढ्यातील भाऊ ठार;


भाच्याने मामाला रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वी झाला मृत्यू सांगोला तालुक्यातील घटना..

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

वाहनाची जोराची धडक बसून झालेल्या अपघातात बहिणीकडे जाणाऱ्या पादचारी भावाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात काल सोमवारी सकाळी ८:३०च्या सुमारास सांगोला-मंगळवेढा रस्त्यावर वाढेगाव-दीघेवाडी जवळ घडला.

मल्हारी भानुदास आवताडे (वय ३९, रा. लेंडवे चिंचाळे, ता. मंगळवेढा) असे मृताचे नाव आहे. याबाबत, भाचा गुरुदेव नवनाथ पवार (रा. वाढेगाव) याने खबर दिली आहे.

पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबत, लेंडवे चिंचाळे येथील मृत मल्हारी आवताडे हे रविवारी रात्री ८:३० वा. घरातून मंगळवेढा सांगोला रोडने वाढेगाव येथील बहीण सारिका नवनाथ पवार हिच्याकडे पायी चालत निघाले होते.

वाटेत दिघेवाडीजवळ सोमवारी सकाळी ८च्या सुमारास भरधाव वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. ते रस्त्यावर पडले होते.

याची माहिती मिळताच, भाचा गुरुदेव पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मामा भानुदास आवताडे होते. त्यांना रुग्णवाहिकेतून सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments