दुर्दैवी घटना! 'आलेगावात अप्रुका नदीत बुडून सातवर्षीय चिमुकलीचा मृत्यू'; कुटुंबियाचा आक्राेश, नेमकं काय घडलं..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : खेळत असताना नदीत पाय घसरून वाहून गेल्याने आलेगाव (ता. सांगोला) येथील तन्वी अजित शिंदे या अवघ्या सात वर्षीय चिमुरडीचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.
दरम्यान, अवघ्या सातवर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
तन्वी शिंदे ही रविवारी (ता. २१) दुपारी घराच्या समोरच खेळत होती. त्यांचे घर अप्रुका नदीच्या काठावरच असून, सलग आठ दिवस झालेल्या पावसामुळे अप्रुका नदीला पूर आला आहे.
खेळत खेळत गेलेली तन्वी नदीपात्रात ती पाय घसरून पडली. तिचे आई- वडील तसेच नातेवाइकांनी तिचा इतरत्र शोध घेतला.
दरम्यान, सोमवारी (ता. २२) आलेगाव (ता. सांगोला) येथील पुलाजवळ तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून.
याबाबत चरणी भटजी शिंदे यांनी सांगोला पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिस नाईक व्यवहारे तपास करीत आहेत.
अतिवृष्टीचा चौथा बळी
अतिवृष्टीमुळे दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यातील नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. या अगोदर महिम येथे कासाळ ओढ्यात पडून सोमनाथ व श्रीधर ऐवळे बंधूंचा मृत्यू झाला होता
. जवळा येथील गंगाधर साखरे चौगुले हे कोरडा नदीत वाहून गेले होते. या तिघांच्या मृत्यूनंतर तालुक्यात अतिवृष्टीचा तन्वी चौथा बळी ठरली आहे.


0 Comments