धनगर आरक्षणासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करणार--आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
जालना येथे समस्त धनगर समाजाच्या वतीने...धनगर समाजाला एस.टी.प्रवर्गात म्हणजे अनुसूचित जमातींमध्ये सामील करुन तमाम धनगरांना अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे.
यासाठी धनगर समाजाचे नेते मा.दिपक बोऱ्हाडे हे आमरण उपोषणाला बसले असून ..
जो पर्यंत धनगर समाजाचा सामावेश एस.टी. (अनुसूचित जमाती)आरक्षणामध्ये मध्ये करीत नाही तोपर्यंत उपोषण सोडले जाणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्ते मा.दिपक बोऱ्हाडे यांनी केला...
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी आज जालना येथे जाऊन धनगर समाजाच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आसुन.
आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मा.दिपक बोऱ्हाडे हे आमरण उपोषणाला बसले असून आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.
आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख बोलताना म्हणाले की,मी स्वतः धनगर समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समावेश करुन राज्य सरकारने या आरक्षणास ताबडतोब मांन्यता द्यावी
आसे पत्र दोनच दिवसांपूर्वी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना दिले असल्याचे सांगीतले.तसेच लवकरच मी मा.मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धनगर समाजाच्या
एस.टी.आरक्षणाच्या समावेशा बद्दल व राज्य भर धनगर समाज आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहे त्यांची व्यथा मी मा.मुख्यमंत्री साहेबांना बोलणार आसल्याचे आमदार साहेबांनी सांगितले.
उपोषण स्थळी मी स्वतःआज उपोषणकर्ते मा.दिपक(भाऊ) बोऱ्हाडे यांच्या प्रकृतीची तपासणी केलेली असुन.
त्यांचा बी.पी स्थिर असला तरी ऋदयाचे ठोके मात्र कमी होत आहेत.कदाचीत आणखीन चार दिवस जर
मा.दिपक भाऊंचे उपोषण असेच चालू राहिले तर मात्र त्यांच्या प्रकृतीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
सद्य स्थितीत मा दिपक भाऊंची प्रकृती खालावलेली आसल्याचे आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
धनगर समाजाचा एस.टी. आरक्षणात उल्लेख आहेच फक्त राज्य सरकारने आंमल बजावणी करायची आहे.धनगर समाज हा काबाड कष्ट करणारा समाज आहे.
राज्यातील धनगर समाजातील अनेक कुटुंबे आजही गावोगाव फिरून आपला उदरनिर्वाह करीत असतात.
आशा धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करुन धनगर समाजाला न्याय देण्यासाठी मी कायम प्रयत्न
करणार असून मी लोक प्रतिनिधी या नात्याने सभागृहात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरणार आहे.
व वेळ पडली तर रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन सुध्दा करणार आहे.
आपल्याला स्वतंत्र्य मिळवू ७८ ,७९ वर्षे होत आली आहेत दरम्यानच्या काळात अनेक सरकारे आली आणी गेली
तरीही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जसाच्या तसा लोंबकळत ठेवला गेला आहे.राज्य सरकारला मी विनंती करतो
की धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ताबडतोब सोडवावा.व धनगर समाजाला न्याय द्यावा असे
आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी जाहीर पणे सांगीतले असल्याचे मत प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले


0 Comments