google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..मराठा समाज आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मेडशिंगी गावात कडकडीत बंद

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..मराठा समाज आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मेडशिंगी गावात कडकडीत बंद

ब्रेकिंग न्यूज..मराठा समाज आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मेडशिंगी गावात कडकडीत बंद


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला/ प्रतिनिधी: मराठा समाज आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आझाद मैदानावरील आंदोलनास व उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सांगोला तालुक्यातील मेडशिंगी गावाने

 रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळला. गावातील सर्व दुकाने, बाजारपेठा बंद ठेवून या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. मेडशिंगी येथील सकल मराठा समाज व ग्रामस्थ यांनी गाव बंद ठेवून आरक्षणास पाठिंबा दर्शविला आहे. 

मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा बांधवांच्या लढ्याला शासनाने सकारात्मक दृष्टीने पाहावे. सरकारने मराठा समाजाचा फार काळ अंत पाहू नये. अन्यथा मराठा समाज आंदोलनाची तीव्रता वाढवल्या शिवाय राहणार नाही अशी भूमिका मेडशिंगी गावाने मांडली आहे. 

सकल मराठा समाजाला शैक्षणिकदृष्ट्या व नोकरीदृष्ट्या आरक्षण महत्त्वाचे आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण नसल्यामुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. तसेच नोकरीही मिळत नाही. त्यामुळे मराठा समाज मागास आहे.

 मराठा समाजातील तरुणांच्या भविष्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावे‌ यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणारा आरक्षण लढा समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments