धक्कादायक..पंढरपुरात तिघा बोगस डॉक्टरांना बेड्या
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
पंढरपूर, कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना डॉक्टर असल्याचे सांगत सर्वसामान्यांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या तिघांच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या.
पंढरपूर तालुक्यातील काही गावात बोगस डॉक्टर असल्याची माहिती पोलिसांना मिळताच मौजे रोपळे गावांत पोलिसांचे पथक मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोहोचले.
त्या ठिकाणी परप्रांतीय असलेले तीन व्यक्ती कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना स्वतः डॉक्टरच आहे असे सांगत उपचार करत होते.
तिघांनाही ताब्यात घेतले. गोविंदा देवीराम प्रजापती (वय २६ रा. भरतपूर राजस्थान), जाहीर खान: (वय २२ रा. पलवल, हरियाणा) व आसिफ दिनमोहम्मद (रा. भरतपुर, राजस्थान) अशी त्यांची नांवे आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्ती या डॉक्टर असल्याची परिसरातील लोकांची फसवणूक करून उपचार करत असल्याचे निदर्शनास आले. या तिनही व्यक्तीविरुद्ध मेडिकल प्रैक्टिशनर अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0 Comments