सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष कडलास ते सांगोला रस्त्यांची दुरवस्था शालेय विद्यार्थी नागरिकांची गैरसोय
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
सांगोला प्रतिनिधी= सांगोला तालुक्यातील कडलास गावाला जोडणाऱ्या NH965G रस्त्याची दुरावस्था झाली
असून सांगोला ते कडलास या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर लिगाडेवाडी ते कडलास स्टॅन्ड एक किलोमीटर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावर अवजड वाहनाचे प्रमाणात अधिक असल्याने रस्ता लवकर खराब होतो, संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांतून होत आहे.
जवळा , घेरडी , सोनंद , लोनविरे , हागिरगे, पारे व जत तालुक्यातील काही गावांना जोडणारा रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
या मार्गावरील दहा हुन अधिक गावातील नागरीकांना उद्योग, व्यवसाय, शाळा, नोकरी, रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी सांगोला शहरात यावे लागते. अशा या खड्डेमय झालेल्या रस्तावरुन जीव मुठीत घेत जीवघेणा प्रवास करावे लागत
असून रात्रीच्या वेळी खड्डय़ाचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत. सांगोला ते कडलास या सात किमी अंतरावर एक किलोमीटरच्या अंतरावरती खड्डे पडल्यामुळे वाहन चालवत असताना चालकांना कसरत करावी लागत आहे.
रस्ता वर्दळीचा असून रस्त्याने अनेकजण प्रवास करतात. नेहमीच हजारो वाहने या रस्तावरून जात येत असल्याने खड्डयामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
शिवाय रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असल्यामुळे दोन वाहने खड्डय़ामुळे व्यवस्थीत पास होऊ शकत नाहीत. एक खड्डा चुकवित असताना दुसऱ्या खड्डात वाहन जावून होणारा नाहक त्रास सहन करीत जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नागरिक,
वाहन चालक अन प्रवाशातून नाराजी दिसून येत आहे. संबंधित विभाग,लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरूस्त करण्याची मागणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांतून होत आहे


0 Comments