सांगोला तहसिल मार्फत महसूल सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महसूल वर्ष हे ०१ ऑगस्ट ते ३१ जुले असे गणाने जाते, जरवणी ०५ ऑगस्ट हा महसूल दिम महणून साजरा केला जातो. राज्यशासन या निमित्ताने विविध कार्यक्रम उपक्रम उपाययोजना हाती घेत असते.
मा. महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी यावर्षी महसूल सप्ताह ०१ ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट असा साजरा करण्याचा व त्यामध्ये विविध उपक्रम उपाययोजना पांचो अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत,
सांगोला तहसिल कार्यालयाअंतर्गत मा. आमदार डॉ. बयायासाहेब देशमुख यांचे हस्ते सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला, त्याचप्रमाणे गतवर्षी उत्कृष्ठ काम करणारे नायब तहसिलदार, सहा, महसूल अधिकारी,
मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी, पाम महसूल सेवक त्याचप्रमाणे प्रत्येक मंडळातील एक पोलीस पाटील यांना प्रशिस्तीपत्रक ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमात घरकुल लाभाथी ज्यांना जमीन नाही असे एकूण ६८ लाभाच्यांना ५०० चौ. फुट चे प्लॉटस बाटप करण्यात आलेले आहेत. यापैकी मांजे चिंचोली, लोटेवाडी व कडलास या गावातील १७ लाभाध्यांना पटटयाचे वाटप करण्यात आले.
दिनांक ०३ व ०४ ऑगस्ट रोजी पाणंद/शिवरस्रयांच्या दुतर्फा वृक्षलागवडीचा कार्यक्रम मौजे धायटी, चिंचोली, अकोला, डोंगरगाव
तिपेहाळी, गौडवाडी, सोनंद, आलेगांब चिकमहुद या गावात घेण्यात आला पाच उपाक्रमांतर्गत शेतरस्त्यांची गाव नमुना ७/१२ वर नोंद घेणे
व जास्तीत जास्त शेतक-यांना सहभागी करुन सर्व रस्त्यावर येत्या एक महिन्यात वृक्षारोपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे असे निश्चित करण्यात आलेले आहे.
प्रत्येक महसूल मंडळ मुख्यालयी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान दिनांक ०४ व ०५ ऑगस्ट रोजी शिबिरे घेण्यात आली. या शिबिरामध्ये उत्पन्न, जात, आदिवास इत्यादी प्रकारचे ७६० दाखले वाटप करण्यात आले.
विशेष सहाय्य योजनेतील डीपीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी देवून अनुदानातील अडचणी सोडविणे सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांची सत्यापन अॅप वर नोंद करणे
त्याचप्रमाणे अॅग्रीस्टेक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढणे व चालू वर्षाच्या ईपीक पाहणीसाठी शेतक-यांना प्रोत्साहित करणे हा उपक्रम दिनांक ०५ ऑगस्ट रोजी हाती घेण्यात आला.
दिनांक ०६ ऑगस्ट रोजी शासकीय जमीनीवरील अतिक्रमणे निष्कासीत करणे किंवा शासन धोरणानुसार नियमानुकुल करणे किंवा सरकार जमा करणे याबाबतचे निर्णय घेण्याची अंमलबजावणीचे काम हाती घेतले जाणार आहे.
सप्ताहाच्या शेवटी मैन्युफैक्चरड सैड (M-SAND) धोरणानुसार उपाययोजना सरकारी, खाजगी गटाची माहिती देणे, त्यांना सदर उपयोग करण्यासाठी त्यांची मनोभूमिका मानसिकता तयार करणे, त्यांना प्रत्सोहन देणे असे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.




0 Comments