शक्तीपीठ महामार्ग मार्गासाठी वझरे येथील जमिनीचे संपादन रद्द करावे....
शेतकऱ्यांची व ग्रामपंचायतीची, ग्रामस्थाची एक मुखी मागणी...वझरे येथील मोजणी थांबवली
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
नाझरे प्रतिनिधी वझरे ता. सांगोला येथील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गास विरोध असून, येथील जमीन संपादित करू नये अशी ग्रामस्थाची, ग्रामपंचायतीची व शेतकऱ्याची एक मुखी मागणी आहे
व यामुळे वजरे येथे भूमि अभिलेख खात्याचे आलेले पथकास शेतकऱ्यांनी जमीन मोजणी प्रखर विरोध केला त्यामुळे हे पथक विना मोजणी परत गेले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड सचिन देशमुख व उपाध्यक्ष दादासो वाघमोडे यांनी
अधिकारी वर्गाने बळजबरी करू नये अन्यथा शेतकरी संघर्ष करतील व मोजणी करणे अशी मागणी बाधित शेतकऱ्याचीच नसून, ग्रामपंचायत ची पण आहे असे यावेळी मल्हारी चव्हाण यांनी सांगितले.
शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी, बोरवेल, पाईपलाईन जाणार असल्याने शेतकरी वर्ग शेतीपासून मुकणार आहे
व मग आम्ही खायचे काय त्यामुळे आमच्या जमिनी शक्तिपीठ महामार्गास घेऊ नयेत अशी मागणी यावेळी सुहास काका देशपांडे व विलास काका देशपांडे यांनी केली.
तसेच येथून चार किलोमीटर अंतरावर पर्यायी मार्ग आहे व या मार्गास हा मार्ग जोडावा म्हणजे सर्वांच्या सोयीचे होईल व जमीन आमच्या हक्काची असून आम्ही ती देणार नाही
असे शेतकरी वसंत पाटील यांनी सांगितले.सदर प्रसंगी बाधित शेतकरी सुहास देशपांडे, राजू पाटील, दत्ता देशपांडे, डॉक्टर सोनवणे, रविराज शेटे, सचिन कोकरे, शुभम करांडे, दिलीप करंडे, हरी देशपांडे, बाबासाहेब सरगर, लक्ष्मण आलदर, नामदेव सरगर,
बाळासो सरगर, विलास देशपांडे,, प्रकाश पाटील, शिवपुत्र पाटील, महानंदा पाटील, पांडुरंग कोकरे, आप्पासो जोंधळे, धोंडाप्पा जोंधळे, बसवेश्वर बळगिरी, संजय देशमुख, तमन्ना पाटील, मल्हारी चव्हाण व शेतकरी वर्ग उपस्थित होता.



0 Comments