खळबळजनक ..सांगोला तालुक्यातील युवकाचे चालत्या गाडीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील चोपडी येथील शिवाजी उर्फ भावड्या केशव बाबर (वय 34) याचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
शिवाजी बाबर हे सकाळी साडेनऊ वाजता कामानिमित्त आटपाडी कडे जाताना खळगे मळा या ठिकाणी चालत्या गाडीमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनी तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला घेतली.
काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली त्यानंतर तेथील ग्रामस्थांनी तात्काळ त्यास पुढील उपचारासाठी आटपाडी येथे दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगितले.
चोपडी गावातील विविध संस्कृतीक कार्यक्रमांमध्ये अत्यंत हिरीरीने सहभागी होणार व्यक्तिमत्व हरपल्याने चोपडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिवजयंती, संभाजी महाराज जयंती किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात चोपडी गावातील सर्व युवकांना एकत्रित घेऊन संघटनात्मक बांधणी करून कार्यक्रम यशस्वी करण्याची हातोटी शिवाजी यांची होती. सर्व आबाला बुद्धांसाठी भावड्या या नावाने ते परिचित होते.
चोपडी गावातील सर्व दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी ,आई-वडील व तीन बहिणी असा परिवार आहे. रात्री उशिरा चोपडी येथील स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments