google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना न्याय : माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना न्याय : माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना न्याय : माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यासह हजारो शेतकऱ्यांना गेली 10 ते 12 वर्षे त्यांच्या भूसंपादित जमिनीचे मोबदले न मिळाल्याने प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. 

मात्र, अखेर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 

यासंदर्भात ठोस निर्णय घेऊन बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने ही मोबदला मिळण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मा.मंत्री महोदयांनी अतिशय संवेदनशील असलेला या विषयाचे महत्त्व

 अत्यंत गांभीर्याने घेऊन उपस्थित सचिवांना तात्काळ सक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून वेळेत सुनावण्या घेऊन शेतकऱ्यांना काळ मर्यादा देऊन निर्धारित वेळेत त्यांचा मोबदला देण्यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईतील मंत्रालयातील दालनामध्ये नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महसूल विभागाचे मुख्य सचिव विकास खर्गे, सहाय्यक सचिव मिलिंद म्हैसकर, ॲड. रितेश कुलकर्णी, 

त्यांचे सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर या बैठकीस सोलापूरचे जिल्हाधिकारी व पुणे विभागीय आयुक्त हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

या निर्णयामुळे सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील साधारणत: 12 ते 15 हजार लाभार्थी शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे व बाधित शेतकऱ्यांची वर्षानुवर्षेची प्रतीक्षा संपणार आहे. 

या महामार्गामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी यांचे भूसंपादन होऊन रस्ते पूर्ण होऊन त्यावरील वाहतूक सुद्धा अनेक वर्ष सुरू झाली मात्र या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी अधिकारी स्तरावरून होणाऱ्या

 प्रक्रिया सक्षम अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः ससेहोलपट झाली. सदर खटल्यामध्ये मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा होण्यासाठी वेळोवेळी तात्काळ सुनावणी होणे गरजेचे होते परंतु पुणे-सोलापूर परत पुणे असा खटला

 सातत्याने चालत गेल्याने जणू शेतकऱ्यांची पूर्णपणे चेष्टा यामध्ये झाली होती. सोलापूर जिल्ह्यातील 10 ते 12 वर्षापासून 15 ते 16 हजार खटले आजपर्यंत प्रलंबित आहेत त्यामुळे मंत्रीमहोदयांनी 

माजी आमदार दिपकआबा यांच्या विनंतीवरून हे आदेश दिल्याने अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा मोबदला मिळण्यासाठी केलेल्या प्रतीक्षेला कायमस्वरूपी पूर्णविराम मिळून अडकलेले मोबदले मिळण्याचा

 मार्ग आता सुकर झाल्याने अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे बाधित शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.

 चौकट

भूसंपादन होऊनही वर्षानुवर्षे मोबदला न मिळाल्याने शेतकरी वेठीस धरले गेले होते. हा केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक अन्याय होता. माझी ही आग्रही मागणी

 महसूल मंत्री नाम. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मकपणे मान्य केली आणि तातडीने निर्णय घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्वतंत्र लवाद नेमून तात्काळ वेळेत सुनावण्या घेऊन सक्षम

 अधिकाऱ्याची नेमणूक करून निर्धारित काळ मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर थेट मोबदला जमा करण्याच्या सूचना दिल्या. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचे यश आहे.

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील

Post a Comment

0 Comments