सांगोला येथे 3 ऑगस्ट रोजी जन्माला येणार्या मुलींच्या नावे 15 हजार रुपयांची ठेव ठेवण्याचा
माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने यांचा संकल्प
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनोखा संकल्प केला आहे. समाजात मुलींचे प्रमाण वाढावे ,मुलगी देखील मुलाप्रमाणे वंशाचा दिवा आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे
या उद्देशाने आपल्या 3 ऑगस्ट रोजी साजरा होत असलेल्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यात वाढदिवसादिवशी जन्मलेल्या मुलींच्या नावे 15 हजार रुपयाची ठेव ठेवण्याचा संकल्प केला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून वाढदिवसा दिवशी जन्मलेल्या मुलींच्या नावे ठेव ठेवण्याचा संकल्प आजही पुढे चालू ठेवला आहे. त्यांच्या या कार्याचा आदर्श महत्त्वाचा मानला जात आहे.
जन्मलेल्या मुलीच्या जन्मासंदर्भात डॉक्टरांचे सर्टिफिकेट, व आधारकार्ड सोबत आणावे . तसेच वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून निसर्गाचे संवर्धन व निसर्गावरचे प्रेम व्यक्त केले जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून वाढदिवसानिमित्त पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण करून त्या वृक्षांची जोपासना करण्याची काळजी ते घेत आहेत. वाढदिवसानिमित्त मुलींच्या नावे ठेव ठेवण्याचा केलेला
संकल्प व वृक्षारोपण कार्यक्रम हा वाढदिवसाचा आगळावेगळा उपक्रम असल्याचे राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ,माजी नगरसेवक तथा गटनेते आनंदाभाऊ माने यांनी सांगितले आहे.
0 Comments