google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात चोपडी येथे विहिरीत पडलेला कोल्हा वनविभागाने सुरक्षित रेस्क्यू केला

Breaking News

सांगोला तालुक्यात चोपडी येथे विहिरीत पडलेला कोल्हा वनविभागाने सुरक्षित रेस्क्यू केला

सांगोला तालुक्यात चोपडी येथे विहिरीत पडलेला कोल्हा वनविभागाने सुरक्षित रेस्क्यू केला


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला : चोपडी (ता. सांगोला) येथे आज रोजी शेतकरी श्री. सुनील राजाराम बाबर यांच्या विहिरीत एक कोल्हा पडला होता. 

अचानक झालेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचाऱ्यांनी शिताफीने रेस्क्यू मोहीम राबवली. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर कोल्ह्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

 बचावकार्य यशस्वी झाल्यानंतर कोल्ह्याला जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.

या तात्काळ आणि यशस्वी रेस्क्यू मोहिमेमुळे ग्रामस्थांनी वनविभागाचे कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments