google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..04 सप्टेंबर रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सुट जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचा आदेश

Breaking News

मोठी बातमी..04 सप्टेंबर रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सुट जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचा आदेश

मोठी बातमी..04 सप्टेंबर रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सुट जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचा आदेश


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२ /८२०८२८४६४७)

गणपती उत्सव 2025 चा नववा दिवस दि.04 सप्टेंबर 2025 रोजी ध्वनीची कायदयाने विहीत केलेली मर्यादा पाळून सकाळी 6.00 वाजलेपासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत 

ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सुट जाहिर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद जारी केला आहे

सोलापूर जिल्हयात गणपती उत्सवावेळी सुशोभिकरण व देखावे मोठ्या प्रमाणात नागरीकांकरीता दाखविण्यात येतात यामध्ये समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाचे देखावे 

इत्यादीचे आयोजन करण्यात आलेले असते. सदरचे देखावे पाहण्यासाठी शेवटच्या तीन दिवसांत नागरीकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. 

बरेच नागरीक देखावे पाहण्यासाठी संध्याकाळी उशीराने घरातुन बाहेर पडत असतात त्यामुळे 04 सप्टेंबर 2025 रोजी सुशोभिकरणा व देखावे याकरीता ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम, 

2017 नियम 5 मधील सुधारित उपनियम (३) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करणेस रात्री 22.00 वाजे पर्यंत ऐवजी रात्री 24.00 पर्यंत वाढ करण्यात आली सदरचा आदेश हा सोलापूर जिल्हयाचे हद्दीत लागू राहिल.

दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2017 अन्वये देण्यात आलेली सुट या सुधारीत आदेशान्वये रद्द करत असून त्याऐवजी दि.04 सप्टेंबर 2025 रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धन वापराकरिता जाहिर केली आहे. 

तथापी सदरची सुट शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही. याची दक्षता सर्वांनी घ्यावी. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments