google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..सांगोला पोलीसांची विशेष कामगिरी गणेश उत्सव कालावधीमध्ये ९ आरोपीतांना सांगोला तालुक्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई आदेश

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..सांगोला पोलीसांची विशेष कामगिरी गणेश उत्सव कालावधीमध्ये ९ आरोपीतांना सांगोला तालुक्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई आदेश

ब्रेकिंग न्यूज..सांगोला पोलीसांची विशेष कामगिरी गणेश उत्सव


कालावधीमध्ये ९ आरोपीतांना सांगोला तालुक्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई आदेश


सांगोला :- दिनांक २७/०८/२०२५ रोजी सांगोला पोलीस ठाणे गु.२.नं. ८८६/२०२३ भा.द.मि. कलम ३२४, ३४१, ३२३. ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ मधील आरोपी मजकुर यांनी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान सागोला पोलीस ठाणे हदीमधील 

साठेनगर सांगोला ता. सांगोला या ठिकाणी फिर्यादी मजकुर हे त्याच्या चारचाकी गाडीतुन मरके कॉलनी सांगोला या ठिकाणी जात असताना फिर्यादीच्या माढीमध्ये गुलाल टाकला

 त्यावेळी फिर्यादीने गाडीत गुलाल टाकू नका असे सांगितले असता यातील सामणेवाला १ ते ७ यांनी फिर्यादी मजकुर थारा गातीतुन खाली ओडून काठीने, हाताने लाथाबुक्याने मारहाण केली आहे.

 त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुक दरम्यान दहशत निर्माण केली होती. तसेच सांगोला पोलीस ठाणे गु.२.नं. ६६४/२०२४ भारतीय न्याय संहित २०२३ चे कलम ११९ (१), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) (३) ३(५) 

आरोपी मजकूर यांनी सार्वजनिक गणेश उत्सव कालावधीमध्ये सागोला पोलीस ठाणे हद्दीमधील मौजे वाकी घेरडी ता. सांगोला या ठिकाणी धनगर समाजाकरीता असलेल्या सार्वजनिक सभामंडपात कसा गणपती बसविता ते बघतोच

 असे म्हणून फिर्यादीत व फिर्यादीच्या नातेवाईकांना मारहाण करून जखमी केले होते, त्यामुळे दोन समाजामध्ये तेड निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता.

सध्या सांगोला पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक २७/०८/२०२५ ते दिनांक ०६/०९/२०२५ रोजी दरम्यान सांगोला तालुक्यात तसेच संपुर्ण महाराष्ट्र मागे ईद-ए. मिलाद व गणेश उत्सव चालु आहे.

 त्यामुळे खालील सामणेवाला यांचेकडुन सांगोला शहरामध्ये तसेच संपूर्ण तालुक्यामध्ये दहशत निर्माण करून कायदा

 व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची दाट शक्यता असल्याने व सदर सामणेयाला हे लोकांना त्रास देवुन, मानवी जिवीतास, आरोग्यास, सुरक्षिततेस बाधा निर्माण करुन सार्वजनिक शांतता भंग करण्यास, 

दंगा किन्वा दंगलीस कारणीभूत होती याची दात शक्यता वाटते. 

असल्याने सामणेवाला यांना दिनांक २७/०८/२०२५ ते दिनांक ०६/०९/२०२५ रोजी पर्यंत सांगोला तालुक्यातुन हद्दपार करणेबाबत प्रस्ताव सादर केलेला होता.

त्या अनुशंगाने बी. आर. माळी उपविभागीय दंडाधिकारी, मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांचे न्यायालयाने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३५२) अन्वये सामणेवाला

९ आरोपीतांना  यांना दिनांक २५/०८/२०२५ ते दिनांक ०६/०१/२०२५ रोजी दरम्यान सांगोला तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई आदेश जारी केले आहेत

सदरची कामगिरी मा. श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण, मा. मा. श्री.प्रितम यावलकर , 

अप्पर पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण मा.श्री डॉ बसवराज शिवपुजे सी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली

 पोलीस निरीक्षक विनोद घुगे सो, सांगोला पोलीस ठाणे, सपोनि पवन मीरे, श्रेणी पौराई गहवे, पोहेकों संतोष देवकर, 

मपोहेकों मनिषा भोसले, पोकों गणेश कुलकर्णी, पोकों राजु आवटे यांनी सदर प्रतिबंधक कारवाई करण्यास मदत केली आहे.

Post a Comment

0 Comments