google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुंबई अग्निशमन दलातील सांगोल्याचा शूरवीर संतोष इंगोले यांना ‘ राष्ट्रपती शौर्य पदक’ माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते गौरव”

Breaking News

मुंबई अग्निशमन दलातील सांगोल्याचा शूरवीर संतोष इंगोले यांना ‘ राष्ट्रपती शौर्य पदक’ माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते गौरव”

मुंबई अग्निशमन दलातील सांगोल्याचा शूरवीर संतोष इंगोले यांना ‘ राष्ट्रपती शौर्य पदक’ माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते गौरव” 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील बामणी गावचे सुपुत्र आणि मुंबई अग्निशमन दलातील गोरेगाव अग्निशमन केंद्र येथे वरिष्ठ केंद्र अधिकारी म्हणून कार्यरत असलेले

 श्री. संतोष रावसाहेब इंगोले यांना अग्नीविमोचन सेवेत केलेल्या शौर्यपूर्ण, अतुलनीय आणि धाडसी कामगिरीबद्दल भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘ राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाले आहे.

ही अभिमानास्पद कामगिरी संपूर्ण सांगोला तालुक्यासाठी गौरवाची बाब असून इंगोले साहेबांच्या धाडसाचे संपूर्ण राज्यभर कौतुक होत आहे.

 जीवन-मरणाच्या प्रसंगी धोक्याची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचविणाऱ्या त्यांच्या शौर्याला राष्ट्रपतींकडून मिळालेला हा सन्मान खर्‍या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

या अभिमानाच्या क्षणी मा. आमदार मा. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या संपर्क कार्यालयात श्री. संतोष इंगोले यांचा विशेष सत्कार केला. 

इंगोले साहेबांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

सत्कार प्रसंगी बोलताना मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, “संतोष इंगोले यांनी संकटाच्या प्रसंगी दाखवलेले धाडस आणि सेवाभाव हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. 

अशा शूरवीर मुलामुळे सांगोला तालुक्याचा कर्तृत्वाचा ठसा राज्यभर उमटत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत.”

कार्यक्रमास सांगोला तालुक्यातील विविध मान्यवर, कार्यकर्ते व इंगोले साहेबांचे कुटुंबीय उपस्थित होते.

मुंबई अग्निशमन दलातील सांगोल्याचा शूरवीर संतोष इंगोले यांना ‘ राष्ट्रपती शौर्य पदक’ – मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते गौरव”

सांगोला तालुक्यातील बामणी गावचे सुपुत्र आणि मुंबई अग्निशमन दलातील गोरेगाव अग्निशमन केंद्र येथे वरिष्ठ केंद्र अधिकारी म्हणून कार्यरत असलेले

 श्री. संतोष रावसाहेब इंगोले यांना अग्नीविमोचन सेवेत केलेल्या शौर्यपूर्ण, अतुलनीय आणि धाडसी कामगिरीबद्दल भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘ राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाले आहे.

ही अभिमानास्पद कामगिरी संपूर्ण सांगोला तालुक्यासाठी गौरवाची बाब असून इंगोले साहेबांच्या धाडसाचे संपूर्ण राज्यभर कौतुक होत आहे.

 जीवन-मरणाच्या प्रसंगी धोक्याची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचविणाऱ्या त्यांच्या शौर्याला राष्ट्रपतींकडून मिळालेला हा सन्मान खर्‍या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

या अभिमानाच्या क्षणी मा. आमदार मा. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या संपर्क कार्यालयात श्री. संतोष इंगोले यांचा विशेष सत्कार केला.

 इंगोले साहेबांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

सत्कार प्रसंगी बोलताना मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, “संतोष इंगोले यांनी संकटाच्या प्रसंगी दाखवलेले धाडस आणि सेवाभाव हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. 

अशा शूरवीर मुलामुळे सांगोला तालुक्याचा कर्तृत्वाचा ठसा राज्यभर उमटत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत.” कार्यक्रमास सांगोला तालुक्यातील विविध मान्यवर, कार्यकर्ते व इंगोले साहेबांचे कुटुंबीय उपस्थित होते.

 *चौकट-* 

बामणी गावातील सुपुत्र व मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे पुतणे पै.सुनील साळुंखे यांनीही काही वर्षांपूर्वी 'हिंदकेसरी' हा किताब मिळवून सांगोला तालुक्याचे नाव उज्वल केले होते. आज ते डी.वाय.एस. पी या पदावर कार्यरत आहेत. 

आणि आजचा बामणी गावातीलच संतोष इंगोले यांच्या रूपाने 'राष्ट्रपती शौर्य पदक' मिळाल्यामुळे सांगोल्या तालुक्याच्या शिरपेचात दुसरा तुरा बसविण्याचे बामणी येथील सुपुत्रांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments