google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..सांगोला तालुक्यातील सोनंद येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई – तब्बल २ कोटी ६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..सांगोला तालुक्यातील सोनंद येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई – तब्बल २ कोटी ६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

ब्रेकिंग न्यूज..सांगोला तालुक्यातील सोनंद येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई – तब्बल २ कोटी ६८ लाखांचा मुद्देमाल जप्त


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील मौजे सोनंद येथे अवैधरीत्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पंढरपूर उपविभागीय 

पोलिसांनी धाड घालून तब्बल २ कोटी ६८ लाख ७२ हजार १९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे तालुक्यात व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीणचे अतुल कुलकर्णी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सोनंद गावातील 

मटन-भाकरी हॉटेलच्या पाठीमागील सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये सचिन साहेबराव काशिद (रा. सोनंद) व शंभुलिंग प्रकाश तेरदाळ (रा. आथणी, जि. बेळगाव) हे विनापरवाना जुगार क्लब चालवत असल्याची माहिती मिळाली होती. 

त्यानुसार सहा. पोलीस अधीक्षक  प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलिस ठाण्याच्या पथकाने दिनांक २९ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली.

कारवाईदरम्यान ५० जण जुगार खेळताना रंगेहात पकडले गेले. पत्त्यांवर पैज लावण्याबरोबरच कॅसिनो काउंटरवर अवैधरित्या देशी-विदेशी दारू साठवली असल्याचेही आढळले. कारवाईच्या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात –रोख रक्कम १६,०९,४८०/

६२ मोबाईल : १३,९१,१००/-,

२६ चारचाकी वाहने : २,०९,००,०००/-

६१ दुचाकी वाहने : २९,६०,०००/-

देशी-विदेशी दारू : ₹११,१६५/-

असा एकूण ₹२,६८,७२,१९५/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदर प्रकरणी ५० इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा १८८७ चे कलम ४, ५ व महाराष्ट्र दारूबंदी कायदा 

१९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक  प्रितम यावलकर

 व सहा. पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे व सांगोला पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या पथकात मसपोनि विभावरी रेळेकर, पोसई भारत भोसले,

 अनिल पाटील, दत्तात्रय तोंडले यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.या मोठ्या कारवाईमुळे सांगोला तालुक्यात अवैध जुगार अड्डे चालविणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments