ब्रेकिंग न्यूज..मराठा आरक्षणासाठी सांगोला तालुक्यातील समाजबांधवांच्या शेकडो गाड्या मुंबईकडे रवाना
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
सांगोला - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी
सांगोला शहर व तालुक्यातील समाजबांधव गुरुवार (ता. २८) रोजी मोठ्या उत्साहात शेकडो गाड्यांसह मुंबईकडे रवाना झाले.
मराठा समाजबांधवांच्या घोषणांनी परिसर दमदमून गेला होता.
आरक्षण हक्कासाठी मुंबई आंदोलनात सहभागी होण्यासाठी यापूर्वी शहर व तालुक्यात दोन बैठका घेण्यात आल्या होत्या.
या बैठकींमध्ये कोणत्या मार्गाने आंदोलनात सहभागी व्हायचे, प्रवासात कोणकोणती काळजी घ्यायची, साहित्य कसे बरोबर न्यायचे याबाबत समाजबांधवांनी नियोजन केले होते.
या नियोजनानुसार गुरुवारी सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाजबांधव एकत्र जमले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समाजबांधवांनी आंदोलनासाठी प्रस्थान केले.
यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जयची', 'जय भवानी, जय शिवाजी', 'अरक्षण आमच्या हक्काचे..' अशा घोषणांनी चौक दुमदुमून गेला. सांगोल्यातून निघालेल्या गाड्या तालुक्यातील विविध मार्गाने पुढे जात एकत्र येऊन पुणेमार्गे मुंबईकडे रवाना झाल्या.
या आंदोलनात सांगोला शहरासह तालुक्यातील विविध गावांतील शेकडो समाजबांधव सहभागी झाले असून, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार या ठिकाणी व्यक्त करण्यात आला.
१) ज्वारी, बाजरीच्या भाकरी, ठेचा अन् चिवडा... -
आरक्षण आंदोलनासाठी निघालेल्या मराठा समाज बांधवांनी गावागावातून एकत्रित येत ज्वारी, बाजरीच्या मोठ्या प्रमाणात भाकरी करून घेतल्या. त्याचबरोबर हिरव्या - लाल मिरचीचा ठेचा तसेच बुंदीचे लाडू व चिवडा करून आपल्या सोबत घेतला होता.
आंदोलनस्थळी किती दिवस राहायला लागेल हे सांगता येत नसल्यामुळे बैठकीतील सूचनेप्रमाणे आंदोलनाकांनी अल्पोपहाराची सोय आपल्याबरोबरच केल्याची दिसून आले.
२) तरुण मंडळाने आंदोलकांना दिली खावूची पाकिटे
शहरातील ६४ वर्ष जुने असलेल्या श्रीराम तरुण गणेश मंडळाने यावेळी मुंबईकडे मराठा आरक्षणासाठी जाणाऱ्या आंदोलकांना खाऊचे पॉकेट तयार करून दिली.
या तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी आंदोलकांना तयार चिवडा व लाडूची पॉकेटे दिली. काही मराठा समाज बांधवांनी या आंदोलकांना रस्त्यात जेवणाची व नाश्त्याचीही अगोदरच सोय केली आहे.
0 Comments