google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'साेलापूर जिल्ह्यात दररोज २४८ जनावरांना होतोय लम्पी'; आतापर्यंत ७२ जनावरांचा मृत्यू

Breaking News

'साेलापूर जिल्ह्यात दररोज २४८ जनावरांना होतोय लम्पी'; आतापर्यंत ७२ जनावरांचा मृत्यू

'साेलापूर जिल्ह्यात दररोज २४८ जनावरांना होतोय लम्पी'; आतापर्यंत ७२ जनावरांचा मृत्यू


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सोलापूर: जिल्हा प्रशासनाकडून लम्पी संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत, तरीही प्रतिदिन २४८ जनावरांना लम्पीचा संसर्ग होत आहे.

 आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २४७३ जनावरांना संसर्ग झाला होता, त्यापैकी २१५३ जनावरांचा आजार कमी झाला आहे.

आतापर्यंत सर्वाधिक पंढरपूर तालुक्यात ५८ तर माळशिरस तालुक्यात ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. बार्शी तालुक्यात संसर्गाचे प्रमाण सर्वात कमी आहे. पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त अहवालानुसार

 अक्कलकोट १४९ पैकी १२१ जनावरे, करमाळा १९४ पैकी १६६, माढा ५६ पैकी २७, माळशिरस ७१९ पैकी ६६२, मोहोळ ४७ पैकी ३७, पंढरपूर ७७५ पैकी ७०० जनावरे लम्पी संसर्गातून बरी झाली आहेत.

सांगोला तालुक्यातील १६३ पैकी १३८, उत्तर सोलापूर ४१ पैकी ३० तर दक्षिण सोलापूर १२० पैकी १०१ जनावरे लम्पी संसर्ग कमी झाला आहे.

Post a Comment

0 Comments