@प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या मदतीसाठी सूचना@ प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या मदतीसाठी दि.२६ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करावे.
पूर्वी अर्ज केलेल्या पत्रकारांनी नियम व अटी पाहून नव्याने अर्ज करावे.-राजा माने, अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई.
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या सहाय्य मिळविण्यासाठी नियम व अटी
१) प्रतिष्ठान पत्रकारांच्या केवळ मुलींसाठीच शैक्षणिक मदत करते.दहावी, बारावी नंतरच्या उच्च व वैशिष्ट्यपूर्ण/अभिनव शैक्षणिक करिअरसाठीच प्रतिष्ठान मदत करते. अपवादात्मक परिस्थितीत पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक मदत करण्याचा विचार प्रतिष्ठानची समिती करु शकते.
प्राथमिक पूर्व, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी प्रतिष्ठान मदत करणार नाही.
२) वैद्यकीय मदत केवळ पत्रकार स्वतः,आई, वडिल आणि पत्रकारांच्या मुला-मुलींसाठीच दिली जाते.इतर नातेवाईकांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
३)कला, क्रीडा व इतर क्षेत्रातील करिअर विकासासाठी दिल्या जाणाऱ्या मदतीसाठी मुख्याध्यापक/प्राचार्य तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षकाचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील.
४) पत्रकार किमान दहा वर्षांपासून सक्रीय पत्रकारितेत असल्याचे संबंधित माध्यमाच्या संपादक/व्यवस्थापनाचे शिफारस पत्र बंधनकारक असेल.
५) डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या तालुका/शहर/जिल्हा/विभागीय किंवा राज्य पदाधिकाऱ्यांचे शिफारस पत्र बंधनकारक राहील.
६) संबंधित अर्जदार पत्रकाराने पोलिस खात्याचा चारित्र्याचा दाखला देणे अनिवार्य राहील.
७) मदतीची रक्कम अपरिहार्यपणे सबंधित संस्थेच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे अर्ज सादर करताना त्या संस्थेचे बँक डिटेल्स, account number,IFSC Code हा तपशिल देणे आवश्यक आहे.
८)अर्ज मंजूर करणे अथवा नामंजूर करणे हा संपूर्णपणे प्रतिष्ठानचा अधिकार राहील.
*#ऑनलाईन अर्जासाठी लिंक्स#*
प्रतिबिंब प्रतिष्ठान:शैक्षणिक मदत आर्थिक सहाय्यासाठी अर्ज –
https://forms.gle/ddnVU9rpkffDUXbb9
प्रतिबिंब प्रतिष्ठान:कला,क्रीडा वैशिष्ट्यपूर्ण करिअर सहाय्यासाठी अर्ज – प्रतिबिंब प्रतिष्ठान
https://forms.gle/h1EGvnr7T9ECCdf1A
प्रतिबिंब प्रतिष्ठान:वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचा अर्ज
https://forms.gle/C2LqpxrGkxLqbv9r5
प्रतिबिंब प्रतिष्ठान:सदस्य नोंदणी अर्ज
https://forms.gle/YuiD77BgmTynLWv17
0 Comments