google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोल्हापूरसाठी 'हायकोर्ट एक्सप्रेस सुरू करा :–अशोक कामटे संघटना सोलापूर जिल्ह्यातील सर्वच विधीज्ञ महासंघाने मागणीस दर्शविला पाठिंबा

Breaking News

कोल्हापूरसाठी 'हायकोर्ट एक्सप्रेस सुरू करा :–अशोक कामटे संघटना सोलापूर जिल्ह्यातील सर्वच विधीज्ञ महासंघाने मागणीस दर्शविला पाठिंबा

कोल्हापूरसाठी 'हायकोर्ट एक्सप्रेस सुरू करा :–अशोक कामटे संघटना सोलापूर जिल्ह्यातील सर्वच विधीज्ञ महासंघाने मागणीस दर्शविला पाठिंबा


सांगोला (प्रतिनिधी) (शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उदघाटन नुकतेच संपन्न झाले. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पक्षकार व विधीज्ञासाठी वेगवान प्रवासाची गरज लक्षात घेता 

 शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने इंटरसिटी रेल्वे सुरू करावी अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या मागणीमध्ये सोलापुरातून पहाटे 5 वाजता सोलापूर– कोल्हापूर– सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्यात यावी. 

किमान कोल्हापूर येथील सर्किट  बेंचमध्ये किमान दररोज 1500 वकील, पक्षकार जिल्ह्यातून ये–जा करतील असा अंदाज आहे. 

 सोलापुरातून या उच्च न्यायालयिन कामकाजाकरिता सोलापूर जिल्ह्यातील पक्षकार व वकील यांची कोल्हापूर येथे आवक –जावक वाढणार आहे. न्यायालयीन कामकाज असल्याने  पहाटे सत्रात ही रेल्वे सोलापुरातून कोल्हापूर एक्सप्रेस सुरू करण्यात यावी, 

व धाराशिव–कोल्हापूर–धाराशिव रेल्वे सुरू करण्यात यावी. या दोन्ही रेल्वेस मोहोळ,माढा,कुर्डूवाडी, मोडनिंब, पंढरपूर, सांगोला, ढालगाव, कवठेमहांकाळ ,सलगरे या ठिकाणी थांबे मंजूर करावेत 

या भागातील नागरिकांची सोय होणार आहे. उच्च न्यायालयीन कामकाजापूर्वी सकाळी दहाच्या सुमारास कोल्हापुर येथे पोहोचावी

 व सायंकाळी परतीच्या प्रवासाकरता सहा वाजता याच मार्गाने हे थांबे घेऊन ही रेल्वे सुरू करावी व त्यास हायकोर्ट एक्सप्रेस नाव देण्यात यावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. 

पुढील कार्यवाहीस्तव आपल्या स्तरावरून विशेष बाब म्हणून या रेल्वे करता आदेश निर्गमित करावेत अशी मागणी रेल्वेमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच 

सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकील बार असोसिएशनचे या मागणीचे ठराव व पत्र देण्यात आले आहे. या रेल्वेमुळे सोलापूर व सांगली जिल्ह्यातील सर्वच प्रवाशांची मोठी सोय होणार आहे अशी माहिती अशोक कामटे संघटनेने दिली .

या निवेदनाच्या प्रती जनरल मॅनेजर, मध्य रेल्वे मुंबई ,खासदार धैर्यशील मोहिते– पाटील, खासदार प्रणितीताई शिंदे,विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर यांनाही देण्यात आले आहेत.

चौकट (1):–

सर्किट बेंचच्या कामासाठी   सोलापूरहुन नव्या इंटरसिटी एक्सप्रेस गाडी सुरू करावी अशी मागणी शहीद अशोक कामटे  सामाजिक संघटनेसह जिल्ह्यातील सर्व विधीज्ञ संघटनांनी केली आहे, पाठपुरावा सुरू आहे . अपेक्षित यश मिळेल.

 ॲड.बाबाराजे जाधव 

अध्यक्ष:–सोलापूर विधीज्ञ महासंघ, सोलापूर

चौकट ( 2):–

उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे कामकाज सकाळी 9.30 सुरू होऊन ते सायंकाळी 4.30 वाजता समाप्त होणार असल्याने या वेळेपूर्वी व नंतर सोलापूर –कोल्हापूर –सोलापूर इंटरसिटी सुरू करावी

 या मागणीचा पाठपुरावा अक्कलकोट, सोलापूर, बार्शी, माढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, करमाळा  विधीज्ञ असोशियनसह कामटे संघटना करीत आहे याबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे 

निलकंठ शिंदे सर,अध्यक्ष:–शहीद अशोक कामटे संघटना ,सांगोला.

फोटो लाईन:–

सोलापूर –कोल्हापूर इंटरसिटी सुरू करण्याकरिता अशोक कामटे संघटनेस पाठिंबा पत्र देताना सांगोला विधीज्ञ  असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य...

Post a Comment

0 Comments