google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ऐका हो ऐका...आपलं मत वाया गेलंय,कारण निवडणुकीत निवडून आलेल्यांना,दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलेला आहे.

Breaking News

ऐका हो ऐका...आपलं मत वाया गेलंय,कारण निवडणुकीत निवडून आलेल्यांना,दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलेला आहे.

ऐका हो ऐका...आपलं मत वाया गेलंय,कारण निवडणुकीत


निवडून आलेल्यांना,दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलेला आहे.

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

माढा लोकसभा व सांगोला विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झालं आणि नवीन आमदार व नवीन खासदार निवडून आले..

लाटेवर स्वार होऊन निवडूण आलेले हे दोन्ही उमेदवार आज घडीला निष्क्रिय ठरले आहेत.

निवडणूक जिंकल्यानंतर हे अशे काही गायब झाले आहेत जसं की कुंभकर्ण झोपल्यावर शांत व्हायचा !

बाता तर लय मोठ्या मोठ्या मारल्या होत्या यांनी... निवडणूकीच्या वर्ष भर आधी पासून आपण देवाचाच अवतार असल्याचे हे भासवायचे..आणि आता ?

आता यांच्या... हातून काम होईना !

खय्राची सोडून संगत खोट्याचा आधार लोकांनी घेतला 

परिणामी कर्तबगार विकासपुरुष हरले व हे जिंकले !!

👆

हे जिंकल्या पासून आत्तापर्यंत आपला भाग,आपला मतदारसंघ वनवासी झाला आहे..न कुठल्या विकास कामांची सुरुवात ना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता..

 सगळं काही गुलदस्त्यात... एवढा मोठा विश्वासघात यांना मतदान करुन झाला आहे की सर्व सामान्य मतदार आज डोक्याला हात लावत आहे.

जे आधी आभाळ फाडून विकास करु अशी वल्गना करायचे ते यांचे कार्यकर्ते तोंड पाडून म्हणत आहेत.." आमच्या नेत्यांचं वजन कमी पडतंय. "

👉 हा सारा भकास काळ पाहून,शहाजीबापूंच्या कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लागला आहे की, बापूंच्या हातून होणारी विकासकामे यांनी पाप करुन बंद पाडली !

आणि मतदार सुद्धा हतबल दिसत आहेत,कि आपल्या हातून चुक घडली.

बापूंच्या हातनं अजून विकास झाला असता..पण लबाड प्रचार एवढा झाला की," सत्यच वाळीत पडलं " !

गेल्या 5 वर्षात जी विकासाची गंगा सांगोला तालुक्यात वाहीली ती आता केवीलवाणी नजरेनं निवडुण आलेल्यांकडे बघत आहे.

आणि निवडुण आलेले.. कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरा करण्यात दंग आहे.

अधिवेशनाच्या काळात मी या विषयावर बोललो..हि मागणी केली,ती मागणी केली असे दावे केले गेले पण 3 अधिवेशन संपून सुद्धा सांगोल्याच्या मातीचं कपाळ भुंडं च दिसतंय..आणि चुकीचा माणूस निवडुण दिल्याचा पश्चात्ताप नागरीकांना होतोय..कारण यांच्या हातनं काहीच होईना..

 फक्त सही पुरती आमदारकी व खासदारकी सांगोला मतदारसंघाला नको होती...आणि तिच सांगोला तालुक्यातील जनतेच्या पदरात पडलीय.

  ✍️ दुखी..व्यतीत सांगोलकर

Post a Comment

0 Comments