खळबळजनक घटना..सांगोला तालुक्यात लांडगा सदृश प्राण्याचा कहर –
आठ ते नऊ जण जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यातील एखतपूर व एखतपूर लगत फॅबटेक टेक्सटाईल जवळील स्कोरकॉन परिसर तसेच पैलवान वस्ती भागात लांडगा सदृश प्राण्याने हल्ला चढवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
या प्राण्याच्या हल्ल्यात आठ ते नऊ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. वनविभागला याबाबत माहिती देण्यात आली असून संबंधित भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील धोका टाळण्यासाठी संबंधित भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments