google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जालन्याचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांच्यावरील अन्यायकारक आरोपांविरोधात निवेदन

Breaking News

जालन्याचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांच्यावरील अन्यायकारक आरोपांविरोधात निवेदन

जालन्याचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी


श्री. अनंत कुलकर्णी यांच्यावरील अन्यायकारक आरोपांविरोधात निवेदन

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

गेल्या दोन अडीच वर्षांपासून जालना जिल्हा पोलीस प्रशासनास काही तथाकथित सामाजिक कार्यकर्ते, तसेच काही व्यक्तींकडून वारंवार असत्याधारित व बिनबुडाचे उपोषण, 

आंदोलन करून त्रास दिला जात आहे. या आंदोलनांचा हेतू प्रामाणिक प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांना विनाकारण अडवणीत आणणे, तसेब त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणे हा असल्याचे स्पष्टपणे जाणवते.

गोपाल चौधरी नावाचा एक व्यक्ती, त्याचे वडील व भाऊ है एका कौटुंबिक वादामुळे सतत अशा उपोषण व आंदोलनात गुंतलेले आहेत. दीड-दोन वर्षांपूर्वी कौटुंबिक वादामुळे गोपालची पत्नी त्याला सोडून

 अमरावती जिल्ह्यात निघून गेली व तिने दुसरे लग्न केले. हे प्रकरण प्रशासनाने स्पष्टपणे कायदेशीर व वैयक्तिक असल्याचे सांगितले

 असून, त्यांना आवश्यक कायदेशीर मदतही देण्यात आली आहे. तरीदेखील, आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी गोपाल चौधरी व त्याचे कुटुंबीय वारंवार उपोषणे,

 'आत्मदहन' सारखे आंदोलन करतात. स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय सणाच्या दिवशी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या पोलीस बंदोबस्तावर असताना, गोपालने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

 अंगावर रॉकेल ओतून आतमध्ये प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला मोठे आव्हान निर्माण झाले. पोलीस उपअधीक्षक श्री. अनंत कुलकर्णी यांनी वारंवार त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला;

 शांततेत व कायद्याच्या चौकटीत प्रकरण सोडविण्याचे आवाहन केले. मात्र संबंधित व्यक्तींनी सूचनांकडे दुर्लक्ष करून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लाध्य शब्दांत शिवीगाळ केली

 आणि तिच्या अंगावरही डिझेल ओतले, ज्यामुळे गंभीर अनुशासनभंगाची स्थिती निर्माण झाली. या प्रसंगी श्री. कुलकर्णी यांनी केवळ कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, तसेच उपस्थित 

पोलीस व - नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलली आणि बाळाचा वापर करावा लागला.

हे कृत्य कोणत्याही प्रकारे वैयक्तिक हेतूने नव्हते; उलट ते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि गंभीर परिणाम टाळण्यासाठी केले गेले.

 गोपाल हा ग्राच मु‌द्यावर प्रत्येक राष्ट्रीय सणाला अशा प्रकारचे उपोषण सुरू करून जाणूनबुजून पोलीस प्रशासनास त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. 

अशा वैयक्तिक कौटुंबिक वादावरून सतत आंदोलन करणे आणि त्या निमित्ताने प्रामाणिक पोलीस अधिकान्यांवर खोटे आरोप करणे ही समाजात चुकीची व धोकादायक पद्धत ठरत आहे.

श्री. अनंत कुलकर्णी यांची कारकीर्द हे सिद्ध करते की ते एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि लोकाभिमुख अधिकारी आहेत, 

त्यांनी जालना तालुका पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी म्हणून काम करताना गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली, समाजातील सर्व घटकांशी संवाद ठेवून

 पोलीस व नागरिकांमध्ये समन्वय निर्माण केला. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा आदर व आवश्यक भीती निर्माण करून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखली.

आम्ही मराठा महासंघ व मराठा क्रांती मोर्चा या संघटनांचे कार्यकर्ते असून, आमची अनेक 

आंदोलने त्यांनी संयमाने व कायदेशीर चौकटीत हाताळली. चुकीसाठी ते कुणावरही कारवाई करण्यास मागेपुढे पाहत नाहीत,

 पण त्याचबरोबर समाजातील व्यक्तींमध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी ते प्रयत्नशील राहतात. आंदोलनादरम्यान आमच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल झाले आहेत,

 पण आम्ही कधीही त्यांच्याविरुद्ध द्वेषभावना ठेवली नाही; कारण ते त्यांच्या नोकरीचा एक भाग आहे, हे आम्हाला ठाऊक आहे.

 म्हणूनच, काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी देशभावनेतून कार्यरत असलेल्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर केलेले आरोप हे निराधार व हेतुपुरस्सर असल्याचे आम्हाला वाटते. 

अशा परिस्थितीत आपण श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मागील उत्कृष्ट सेवाकार्याचा विचार करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा, अशी आमची नम्र विनंती आहे.

टीप: आम्ही गेल्या २०-२२ वर्षांपासून सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहोत. याचीही शहानिशा करून संबंधित प्रामाणिक अधिकाऱ्यास न्याय द्यावा.

Post a Comment

0 Comments