खळबळजनक..बहिणीने आईवरून अपशब्द वापरला म्हणून भावाचा गळा चिरला,
जयसिंगपूर पोलिसांना तपासात धक्कादायक माहिती उघड
चिपरी (ता. शिरोळ) येथील संदेश लक्ष्मण शेळके याच्या खूनप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी तिघांना अटक केली. संशयितांना येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. ११) पोलिस कोठडी सुनावली.
सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता वर्षा पाराज-पाटील यांनी काम पाहिले. जयसिंगपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत खुनाचा उलगडा केला आहे.
मृत संदेशच्या बहिणीने संशयित युवराज माळी याच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून चिपरी येथे संदेशचा खून केल्याची कबुली दिली.
युवराज रावसाहेब माळी (वय ३०), गणेश संभाजी माळी (२५, दोघे रा. चिपरी ता. शिरोळ), सूरज बाबासो ढाले (३०, रा. खोची, ता. हातकणंगले) यांना जयसिंगपूर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली.
चिपरी येथे खून झाल्यानंतर पोलिसांनी दोन सीसीटीव्हीची पडताळणी करून त्याचबरोबर गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चिक्कोडी (जि. बेळगाव) येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर मृत संदेशच्या बहिणीने संशयिताच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा राग मनात
धरून संदेशकडून लिफ्ट मागण्याचा बहाणा करून संदेशच्या मानेवर सपासप वार करून खून केल्याची कबुली दिली आहे.
खून करून सूरज ढाले व गणेश माळी यांच्या मोटारसायकलवरून चिक्कोडी येथे पळून केल्याची कबुली संशयित युवराज माळी याने दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक दीपक कदम, उपनिरीक्षक प्रवीण माने, युनूस इनामदार, किशोर अंबुडकर, नीलेश मांजरे, ताहीर मुल्ला,
रहिमान शेख, बाळासाहेब गुत्ते, रूपेश कोळी, जावेद पठाण यांच्या पथकाने कारवाई केली. दरम्यान, खूनप्रकरणी संशयितांवर कठोर कारवाई करावी.
यातील संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन चिपरी येथील धनगर समाजाच्यावतीने पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांना देण्यात आले आहे.
0 Comments