सांगोल्यात 'लम्पी'चा प्रादुर्भाव वाढला; जवळा, एखतपूरमधील
२ गायींचा मृत्यू ६० हजार जर्सी गायींना लस : ५० हजार लसींची मागणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
सांगोला : सांगोला तालुक्यातील जवळा व एखतपूर गावात 'लम्पी'मुळे दोन संकरित (जर्सी) गायींचा मृत्यू झाल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागामार्फत
सांगोला तालुक्यातील सुमारे ६० हजार जर्सी गायींना लसीकरण केले असून, आणखी ५० हजार लसीची मागणी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे केल्याचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी असलम सय्यद यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात लम्पी आजाराने पुन्हा थैमान घातल्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहेत. सांगोला तालुक्यात सुमारे ९० जर्सी गायी लम्पी बाधित असून, उपचारानंतर ३५ गायींच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
तर जवळा व एखतपूर गावात पशुपालकाची प्रत्येकी एक गाय मृत पावली आहे. लम्पी आजाराच्या अनुषंगाने पशुसंवर्धन अधिकारी शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन भेटी देत असून,
आजाराची लक्षणे दिसून आल्यास बाधित जनावरे इतरत्र ठिकाणी कोठेही न दाखवता पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करून घेण्याचे आवाहन करीत आहेत.
पशुगणनेनुसार आतापर्यंत ९५ हजार जर्सी गायींपैकी ६० हजार जर्सी गायींना लसीकरण केले आहे. आणखी ५० हजार लसींची मागणी जिल्हा उपयुक्त यांच्याकडे केली आहे.
लस उपलब्ध होताच उर्वरित जर्सी गायींना लसीकरण केले जाणार असल्याचे असलम सय्यद यांनी सांगितले तर गटविकास अधिकारी यांच्यामार्फत ग्रामपंचायतींना लेखी पत्र देऊन
जनावरांच्या गोठ्यात कीटकनाशक, गोचीड व गोमाशी नाशक औषधाची फवारणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. पशुपालक शेतकऱ्यांनी आपापल्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
0 Comments