google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक.. महूद येथील मॉलमधून दोन लाखांच्या मालाची चोरी; दिवसा गावगुंडाच्या तर रात्री चोरांचा त्रास

Breaking News

खळबळजनक.. महूद येथील मॉलमधून दोन लाखांच्या मालाची चोरी; दिवसा गावगुंडाच्या तर रात्री चोरांचा त्रास

खळबळजनक.. महूद येथील मॉलमधून दोन लाखांच्या मालाची चोरी; दिवसा गावगुंडाच्या तर रात्री चोरांचा त्रास


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

महूद : येथील किरण ट्रेडिंग कंपनी या मॉलमध्ये शनिवारी (ता. १९) मध्यरात्री मागील शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीचा किराणामाल लंपास केला आहे. 

वारंवार होणाऱ्या चोऱ्या आणि एकाही चोरीचा न लागलेला तपास यामुळे या परिसरातील चोरांचा आत्मविश्वास बळावला आहे.

दिवसा गावगुंडांचा त्रास आणि रात्री चोरट्यांचा धुमाकूळ यामुळे येथील व्यापारी त्रस्त झाले आहेत.

महूद येथील मुख्य चौकालगत पंढरपूर रस्त्यावरती किरण ट्रेडिंग कंपनी हा किराणा मालाचा व जीवनावश्यक वस्तूंचा मॉल आहे. शनिवारी (ता.१९) मध्यरात्री चोरट्यांनी या दुकानाच्या मागील बाजूस असलेले शटर उचकटून मॉलच्या गोदामामध्ये प्रवेश केला. 

गोदामामध्ये असलेले तूप, सुकामेवा, डाळी, साबण आदी किराणा सामान व इतर जीवनावश्यक वस्तू असा सुमारे दोन लाख रुपये किमतीचा माल चोरून नेला आहे. त्याचबरोबर मॉलमध्ये असलेल्या काउंटरमधील काही चिल्लर व रोख रक्कमही चोरून नेली आहे.

पंढरपूर-मल्हारपेठ व जत ते मुंबई या मार्गावर चौकाच्या ठिकाणी असलेले महूद हे गाव परिसरातील सुमारे वीस छोटी-मोठी गावे व वाड्या वस्त्यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. 

गावची लोकसंख्या वीस हजाराहून अधिक आहे. व्यवसाय, व्यापारासाठी चांगले लोकवस्तीचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी विविध प्रकारचा व्यापार, व्यवसाय सुरू

 करून बाजार पेठ फुलविण्याचा प्रयत्न परिसरातील व्यापारी करत आहेत. सांगली जिल्ह्यातील अनेक दुकानदारांनी आपली सोन्या-चांदीची दुकाने महूदमध्ये थाटली आहेत.

मात्र, गावगुंड व्यापारी व व्यावसायिकांना नेहमी शिवीगाळ करून अनेक प्रकारे त्रास देत असतात. दिवसा गावगुंडांचा त्रास सुरू आहे. 

तर दुसरीकडे रात्रीच्या वेळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. किरण ट्रेडिंग कंपनीमध्ये झालेल्या चोरीबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा पळवली

किरण ट्रेडिंग कंपनी या मॉलमध्ये सुरक्षेसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र शनिवारी चोरट्यांनी ही सीसीटीव्ही यंत्रणा चोरून नेली आहे. त्यामुळे तपास कामासाठी त्याचा उपयोग होणार नाही.

Post a Comment

0 Comments