सांगोला शहरांमध्ये भव्य मोर्चाला मातंग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे :- ॲड.अभिषेक कांबळे.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- समाजव्यवस्थेने नेहमीच दुर्लक्ष केलेल्या मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी उद्या गुरुवार दि.24 जुलै रोजी सांगोला तहसील कार्यालयावर लहुजी पॅंथर सेनेचा भव्य मोर्चा धडकणार
असून या मोर्चाला मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे मार्गदर्शक ॲड.अभिषेक कांबळे यांनी केले आहे.
या मोर्चातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे भारत देशासह संपूर्ण जगामध्ये डफावर थाप मारून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण जगामध्ये सामाजिक व्यवस्थेमध्ये होणाऱ्या अन्यायावर प्रहार करत
नागरिकांची जनजागृती केली अशा महापुरुष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती मध्ये अ ब क ड वर्गीकरण तात्काळ करण्यात यावे,
सांगोला शहरात क्रांती पिता लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, सांगोला तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करून तात्काळ घरकुलधारकांना वाळू उपलब्ध करून द्यावी,
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ च्या जाचक अटी रद्द करून तरुणांना तात्काळ कर्ज देण्यात यावे, मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे.
या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवार दि.२४ जुलै रोजी सकाळी ठीक १० वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पंढरपूर रोड येथे समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित रहावे
तेथून सर्व समाज बांधवांनी महात्मा फुले चौक येथे एकत्र येऊन तेथून भव्य असा पायी मोर्चा सांगोला शहरातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत सांगोला तहसील कार्यालयावर धडकणार आहे.
या मोर्चासाठी मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लहुजी पॅंथर संघटनेचे मार्गदर्शक ॲड.अभिषेक कांबळे यांनी केले आहे.
0 Comments