google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक...जादुटोणा, करणीचं भूत बसलं डोक्यात, सांगलीतील कवठेमहांकाळ येथे एकाच कुटूंबातील चौघांकडून विष प्राशन; सासू-सुनेचा मृत्यू, बाप-लेकाची प्रकृती गंभीर

Breaking News

धक्कादायक...जादुटोणा, करणीचं भूत बसलं डोक्यात, सांगलीतील कवठेमहांकाळ येथे एकाच कुटूंबातील चौघांकडून विष प्राशन; सासू-सुनेचा मृत्यू, बाप-लेकाची प्रकृती गंभीर

धक्कादायक...जादुटोणा, करणीचं भूत बसलं डोक्यात,  सांगलीतील कवठेमहांकाळ येथे


एकाच कुटूंबातील चौघांकडून विष प्राशन; सासू-सुनेचा मृत्यू, बाप-लेकाची प्रकृती गंभीर

सांगली : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात

 सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. नांगोळे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये सासू आणि सुनेचा मृत्यू झाला तर वडील आणि मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने सांगलीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय ४५) असे मृत सासूचे, तर काजल समीर पाटील (वय ३०) असे सुनेचे नाव आहे. अल्लाउद्दीन मकबूल पाटील (वय ५५) आणि समीर अल्लाउद्दीन पाटील (वय ३५) या पिता-पुत्राची प्रकृती चिंताजनक

 असल्याने त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कुटुंबातील दोन बालके मात्र सुखरूप आहेत. नांगोळे-ढालगाव रस्त्यालगत पाटील कुटुंबीयांचे घर आहे. 

घरामध्ये अल्लाउद्दीन मकबूल पाटील, रमेजा अल्लाउद्दीन पाटील, समीर अल्लाउद्दीन पाटील व काजल समीर पाटील यांच्यासह दोन लहान मुले राहतात.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी शेजारील वृध्द महिला पाटील यांच्या घरी आली असता, चौघेही निपचिप पडलेले दिसले. तिने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावले. 

घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरामध्ये पाहणी केली असता, चार ग्लास आढळले.

घरात आढळले औषध

तसेच कापून ठेवलेला लिंबू आणि सुरी व बाजूला जनावरांसाठी वापरले जाणारे औषध आढळून आले. त्यामुळे चौघांनीही विषारी द्रव्य प्राशन केले असावे,

 असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. समीर पाटील यांना सहा वर्षांचा एक आणि दोन महिन्यांचा एक, अशी दोन मुले आहेत. सुदैवाने ही दोन्हीही मुले बचावली. 

सर्वांना कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, रमेजा पाटील आणि काजल पाटील यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती समजताच जत उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, निरीक्षक जोतिराम पाटील यांनी तातडीने कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात तसेच नांगोळे

 येथे घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, पाटील कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबतचे कारण मात्र अस्पष्ट असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments